10 Business Idea For Village : मालामाल बनवणाऱ्या 10 बिझनेस

 10 Business Idea For Village

मालामाल बनवणाऱ्या 10 बिझनेस Idea

10 Business Idea For Village

नोकरीच्या शोधात अनेक लोक आपले शहर किंवा गाव सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होतात. अनेकांना घर सोडायचे नसते, परंतु नोकऱ्या त्यांना तसे करण्यास भाग पाडतात.

आजकाल लोक नोकऱ्या सोडून व्यवसाय करू लागले आहेत. तुम्हाला तुमच्या शहरात किंवा गावात यशस्वी व्यवसाय सुरू करायचा आहे का? कोणता स्टार्टअप तुम्हाला प्रचंड नफा मिळवून देईल? हेच आपण आजचा पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

10 Business Idea For Village

आम्ही तुमच्यासाठी अशाच 10 Business Idea (10 Business Idea For Village) घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही अगदी गावातून किंवा छोट्या शहरातून सुरुवात करू शकता !आणि मोठा नफा मिळवू शकता.

हेही वाचा – Plastic Bottle Manufacturing – Business Ideas
  1. Organic Farming (सेंद्रिय शेती)
  2. Agricultural Tourism/Rural Tourism (कृषी पर्यटन /ग्रामीण पर्यटन)
  3. Dairy Product Manufacturing Business (दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय)
  4. Computer Training Center (संगणक प्रशिक्षण केंद्र)
  5. CSC  Center (सी.एस.सी.सेंटर )
  6. Goat Farming Poultry Farming Business (शेळीपालन कुक्कुटपालन व्यवसाय)
  7. Papad Pickle Gruh-udyog (पापड लोणची गृहउद्योग)
  8. Hotel Business (हॉटेल व्यवसाय)
  9. Internet / wifi service (इंटरनेट / वायफाय सेवा)
  10. Grocery store (किराणा दुकान)

Organic Farming (सेंद्रिय शेती)

तुम्ही जर शेतकरी असाल तर सेंद्रिय शेती तुम्हाला मोठा नफा मिळवुन देईल. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्यास सध्या शहारत चांगली मागणी आहे. शहरातील ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होत असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल तर शेंद्रीय शेती तुम्हाला कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवुन दिऊ शकते.

Agricultural Tourism/Rural Tourism (कृषी पर्यटन /ग्रामीण पर्यटन)

शहरातील किंवा परदेशी पर्यटकांना नेहमीच शेती,गाव यांची ओढ असते. त्यांना वीकेंडला निवांत स्थळी जायचे असते, तुम्ही आशा पर्यटकांना कृषी पर्यटन किंवा ग्रामीण पर्यटन कॅम्पसच्या माध्यमातून आकर्षित करून नक्कीच चांगला व्यवसाय सुरु करू शकता. कृषी पर्यटन किंवा ग्रामीण पर्यटन हा सेंद्रिय शेतीस पूरक व्यवसाय आहे, कारण हे पर्यटक आपल्या सेंद्रिय शेतीतील भाजीपाला हि खरेदी करतील. याचा फायदा तुम्हाला तुमचा नफा दुप्पट होण्यासाठी नक्कीच होईल.

Dairy Product Manufacturing Business (दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय)

आपल्या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करून दही,ताक,लसी,पनीर,आईस्क्रम यासारखी उत्पादने तयार करून तुम्ही एक चांगला प्रोफीटेबल व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनिंग आणि काही मशनरींची आवश्यकता आहे. तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता, याशिवाय सरकार या व्यवसायासाठी कर्ज आणि सबसिडी देखील देते.

Computer Training Center (संगणक प्रशिक्षण केंद्र)

कॉम्पुटरचे ज्ञान प्रत्येकाला आसने आवश्यक आहे, शहरात जाऊन प्रशिक्षण घेणे हे गावातील मुलांना वेळखाऊ आणि पालकांना खर्चिक आहे. तेच प्रशिक्षण जर गावात मिळालेतर, मुलांचा वेळही वाचेल पालकांचा खर्चही कमी होईल.

CSC  Center (सी.एस.सी.सेंटर )

तुम्ही तुमच्या गावात सी.एस.सी.सेंटर सुरु करून सर्व सरकारी, निमसरकारी कामे, विविध प्रकारचे दाखले, मनी ट्रान्सफर, PAN कार्ड, आधार कार्ड, अपडेट या सारखी कामे करून चांगली कमाई करू शकता. या साठी https://register.csc.gov.in/या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

हेही वाचा – यशस्वी व्यक्तींच्या दररोजच्या ०९ सवयी, ज्या त्यांना जीवनात यशस्वी बनवतात.

Goat Farming Poultry Farming Business (शेळीपालन कुक्कुटपालन व्यवसाय)

शहरात गावरान मटण, चिकनची चांगलीच मागणी आहे. तसेच गावरान अंडी, लेंडी खत आणि कूटकूट खत यातूनही आपण चांगले उत्पन्न कमवू शकतो. हे व्यवसाय योग्य प्रशिक्षण घेऊनच सुरु करावेत.

Papad Pickle Gruh-udyog (पापड लोणची गृहउद्योग)

गावातील महिलांना एकत्रित करून तुम्ही हा गृहउद्योग सुरु करू शकता. यात तुम्ही विविध प्रकारचे पापड, लोणची, चटण्या, मसाले तयारकरून आकर्षक पॅकिंग करून विकू शकता.शहरात या पदार्थाना पहिली पसंती दिली जाते.

Hotel Business (हॉटेल व्यवसाय)

तुमचे गाव शहरालगत मुख्य रस्त्याला लागून असेलतर हॉटेल व्यवसाय तुमच्यासाठी Best Business Idea होऊ शकते. गावरान चिकन,मटण, किंवा व्हेज मध्ये विविध प्रकारच्या थाळी जसे की पिठले भाकरी आशा प्रकारचा जेवणाचा ग्राहकांना आस्वाद देऊन तुम्ही एक चांगला व्यवसाय उभारू शकता.

Internet / wifi service (इंटरनेट / वायफाय सेवा)

आज खेड्यापाड्यात शिक्षणाबाबत जागरुकता वाढत असल्याने खेड्यातील मुलांनाही इंटरनेट सेवेची गरज आहे. यासाठी तुम्हाला चांगली संगणक प्रणाली आणि उत्तम हायस्पीड इंटरनेट कनेक्शन लागेल. BSNL आणि इतर खाजगी दूरसंचार कंपन्या भाडेतत्त्वावर इंटरनेट कनेक्शन देतात. याशिवाय अनेक कंपन्या एअर फायबरच्या माध्यमातून वायरलेस ब्रॉडबँड सेवाही देत ​​आहेत.

10 Business Idea For Village : Grocery store (किराणा दुकान)

किराणा व्यवसाय हा बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही लहान आणि मध्यम आकाराचे किराणा दुकान उघडू शकता. तुमच्या गावातील लोकसंख्येनुसार किराणा दुकान लहान, मध्यम की मोठे हे तुम्ही ठरवू शकता. तुमचे गाव आजूबाजूच्या गावांपेक्षा मोठे असेल तर तुम्ही तेथे मोठे आणि घाऊक किराणा दुकानही उघडू शकता. गावांमध्ये किराणा दुकान उघडणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

यशस्वी व्यक्तींच्या दररोजच्या ०९ सवयी, ज्या त्यांना जीवनात यशस्वी बनवतात.

अशाच बिझनेस आर्टिकल्ससाठी  व्हाट्सअप ग्रुप  जॉईन करा.

Join WhatsApp Group 

Leave a Comment