9 Habits of high achievers who always succeed in life
यशस्वी व्यक्तींच्या दररोजच्या ०९ सवयी, ज्या त्यांना जीवनात यशस्वी बनवतात.
यश हे काही अचानक भेटत नाही, ते मिळवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती,मेहनत आणि त्यासाठी समर्पित मानसिकता असते. हीच गोष्ट यशस्वी व्यक्तींना इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करते. जीवनात त्यांच्यावर काहीही प्रसंग असो ते नेहमी यशस्वी होण्याचा मार्ग शोधतात, त्यात त्यांच्या Unique सवयीचा म्हत्वाचाच वाट असतो.
तुम्ही विचार करत असाल तर, या सवयी काही वेगळ्या आणि सिक्रेट नाहीत, तर त्या आपल्या दररोजच्याच आहेत. आपण जर या सवयी अंगिकारल्यातर आपल्या जीवनात नक्कीच महत्वपूर्ण बदल घडेल. या ब्लॉग मध्ये त्या युनिक सवयी कोणत्या ? ते जाणून घेऊ.
त्या युनिक सवयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आतुर असाल तर, खाली दिलेल्या यशस्वी व्यक्तींचा ९ सवयी काळजीपूर्वक वाचा आणि त्या आत्मसात करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
[01] Set your Clear Goals स्पष्ट ध्येये सेट करा.
[02] Keep a positive mindset सकारात्मक मानसिकता ठेवा.
[03] Maintain a constant learning attitude सतत शिकण्यासची भूमिका ठेवा.
[04] Manage time effectively प्रभावी वेळेचे व्यवस्थापन करा.
[05] Accept Failure अपयश स्वीकारा.
[06] Always express gratitude नेहमी कृतज्ञता व्यक्त करा.
[07] Don’t be shy to ask for help मदत मागायला लाजू नका.
[08] Don’t neglect your health आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
[09] Never give up कधीही हार मानू नका.
Set your Clear Goals स्पष्ट ध्येये सेट करा.
यश हे काही नशिबाने भेटत नाही,तर ते मिळवण्यासाठी Clear, Focused Goals ठेवा. यशस्वी व्यक्तीना हे चांगले माहित असते, ते आपले भविष्य कधीच नशिबावर सोडत नाहीत. त्याऐवजी ते त्यांना काय साध्य करायचे आहे, त्याचे ध्येय सेट करून त्याचा विशिष्ट असा रोडम्याप सेट करतात. त्यांना हे स्पष्ठ असते कि आपले ध्येय काय आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. हि सवय ते त्यांचा व्यावसाईक आयुष्यापर्यंतच मर्यादित ठेवत नाहीत तर ते वयक्तिक आयुष्यात हि उपयोगात आणतात.
Clear आणि Focused Goals ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितीत हि Motivated आणि Committed राहण्यास मदत होते. हा यशस्वी व्यक्तींच्या यशाच्या यशाचा रोड म्याप आहे.
Keep a positive mindset सकारात्मक मानसिकता ठेवा
यशस्वी व्यक्ती नेहमी Positive Mindset ठेवतात,आयुष्यत त्यांना कितीही अडचणी आल्या तर ते त्यांना सहज पेलतात.
मी माझा वयक्तिक एक अनुभव शेअर करू इच्छितो.
काही वर्षांपूर्वी मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो,जो माझ्या करिअरसाठी गेम चेंजर ठरणार होता. पण प्रोजेक्ट जेव्हा आम्ही लॉन्च करणार होतो तेव्हा आम्हाला खुप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले.
घाबरून जाण्याऐवजी किंवा हार म्हणण्याऐवजी मी या अडथळ्याकडे एक संधी म्हणून पहाणे पसंत केले. माझा या प्रोजेक्टवर विश्वास होता आणि मला माहित होते, आपण जर या आव्हानावर मत करू शकलो तर आपले यश आणखी गोड करू.
आणि नेमक तेच झाल.
त्यासाठी आम्हाला रात्री उशीरपर्यंत जास्तीचे काम करावे लागले, पण आम्ही त्या आलेल्या सर्व अडचणी दूर केल्या आणि आम्ही आमचा प्रोजेक्ट लॉन्च केला. हे एक माझ्यासाठी मोठे यश होते आणि यामुळे माझ्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेण्यास मदत झाली.
हि Positive Mindset ची शक्ती आहे. ते अडथळ्यांना संधीमध्ये आणि अपयशाला यशामध्ये बदलते.
Maintain a constant learning attitude सतत शिकण्यासची भूमिका ठेवा.
तुम्हाला माहिती आहे का ? जग प्रसिद्ध इन्व्हेस्टर Warren Buffet हे त्यांचा दिवसाचा ८०% वेळ वाचनात घालवतात. याच त्यांच्या सवयीने त्यांना आतापर्यंतच्या यशस्वी गुंतवणूकदारं Successful Investors
पैकी एक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
हे एक उद्धरण आहे, यशस्वी लोक नेहमी शिकत राहतात. ते कधीही शिकणे थांबवत नाहीत, कारण त्यांना माहित आहे कि सतत नवनवीन गोष्टी विकसित होत आहेत आणि त्या सोबत जर आपल्याला रहायचे असेल तर आपल्याला ते नॉलेज मिळवणे आणि त्यात सतत वाढ करणे गरजेचे आहे.
त्यामुळे सतत शिकत राहणे हे आपले Professional life सोबत Personal life सुधारण्यात मदतगार ठरते.
Manage time effectively प्रभावी वेळेचे व्यवस्थापन करा.
Time is Money हि प्रचलित म्हण तुम्हाला माहित असेलच. यशस्वी व्यक्त्ती आपल्या आयुष्यात पैशा पेक्षा वेळेला जास्त महत्व देतात.वेळेचा वापर प्रभावीपणे कसा करायचा हे त्यांना चांगले माहित असते. ते नेहमी आपल्या Goalsच्या दृष्टीने जे महत्वाचे आहे त्याच गोष्टींना ते प्राधान्य देतात.
ते त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक सेट करतात आणि त्यानुसार आपल्या दिवसाचे नियोजन करतात.
तुम्ही असे समजू नका कि त्यांच्या या वेळापत्रात फक्त काम आणि कामच असते, तर त्यांच्या या वेळापत्रकात Relaxation आणि Hobbisसाठी वेळेचे नियोजन केलेले असते. या गोष्टी त्यांना रिचार्ज करतात. आपली productivity वाढवण्यासाठी याची त्यांना मदत होते.
त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी असेल तर, वेळेचे योग्य नियोजन कराआणि त्यानुसार काम करायला सुरवात करा. तुमचे Goals Achieve करण्यासाठी जे महत्वाचे आहे त्यांना आधी प्राधान्य द्या आणि येणाऱ्या अडचणींना इफेक्टिवली म्यानेज करा.
Accept Failure अपयश स्वीकारा.
Failure is a part of life अपयश हे एक जीवनाचा भाग आहे. यशस्वी व्यक्ती अपयश आले म्हणून खचून जात नाहीत, निराश तर आजिबात होत नाहीत.
ते अपयशाकडे एक संधी म्हणून पाहतात, अपयशाचे कारण शोधून भविष्यात त्या चुका होणार नाहीत यासाठी प्रयत्न करतात.
Always express gratitude नेहमी कृतज्ञता व्यक्त करा.
कृतज्ञता व्यक्त केल्याने लोकांना अधिक सकारात्मक भावना जाणवण्यास, चांगल्या अनुभवांची कदर करण्यास आणि त्यांच्याकडे काय कमी आहे यापेक्षा त्यांच्याकडे काय आहे याचा अधिक खोलवर विचार करण्यास मदत होते.
जर तुमच्या आयुष्यात कोणीतरी निस्वार्थपणे तुमच्यासाठी काही करत असेल आणि तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर Thankyou पुरेसे नाही. तर तुह्माला असे काही करावे लागेल कि ती व्यक्ती Motive होईल आणि आपण करत असलेल्या कामाबद्दल प्रामाणिक राहील.
Don’t be shy to ask for help मदत मागायला लाजू नका.
यशस्वी व्यक्ती कधीही मदत मागायला लाजत नाहीत. कारण त्यांना माहित आहे, कि सर्वच प्रश्नांची उत्तरे आपलाकडे नाहीत. ते गरजेच्यावेळी मदत घ्यायला कमीपणा वाटून घेत नाहीत. वयक्तिक मी याचा अनुभव घेतला आहे.
माझ्या अडचणीच्या वेळी, मी माझा आभिमान बाजूला ठेऊन आवश्यक त्या सर्व व्यक्तींची मदत घेतली. या कृतीने मी यशस्वी तर झालोच त्याच बरोबर माझ्याकडे नम्रता आली आणि मला सहकार्याचे सामर्थ्य आनुभवता आले.
त्यामुळे अडचणीच्यावेळी एखाद्याला मदत मागायला कधीच लाजू नका. मदत करणारी व्यक्ती लहान आहे, मोठी आहे, माझ्यापेक्षा कमी शिकलेली आहे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे याने काहीही फरक पडत नाही. आपल्या अड़चणीच्यावेळी ती व्यक्ती आपली गुरु असते. याठिकाणी आपली अडचण दूर होणे महत्वाचे आहे, ना कि आपला इगो.
Don’t neglect your health आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
यशस्वी व्यक्तींना आरोग्याचे महत्व सांगायची गरज नसते.
त्यांच्या वेळापत्रकात पुरेशी झोप, व्यायाम, संतुलित आहार यांचा समावेश असतो. ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. कारण त्यांना माहित आहे कि आपल्या उत्तम कामगिरी आपले आरोग्य खूप महत्वाचे आहे.
त्यामुळे आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. आपल्या डेली रुटीनमध्ये पुरेशी झोप, व्यायाम, संतुलित आहार यांचा समावेश करा.
Never give up कधीही हार मानू नका.
सर्वात महत्वाचे म्हणजे,यशस्वी व्यक्ती ह्या आपल्या ध्येया बद्दल निश्चयात्मक असतात. त्यांचे ध्येय कधीही विचलित होत नाही. त्यांचा ध्येयाचा मार्ग कितीही खडतर आसला तरी हि ते हार मानत नाहीत.
त्यांना माहित आहे, यश हे सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. ते सतत प्रयत्न करत राहतात, यामुळेच ते यशस्वी होतात.
यशस्वी व्यक्तींच्या दररोजच्या या सवयी, त्यांना जीवनात यशस्वी बनवतात.
हा सम्पूर्ण ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर, मित्रांना नक्कीच शेअर करा. आशाच ब्लॉग पोस्टसाठी yashaswiudyog.comचे पुश नोटिफिकेशन ऑन करा.