Startup idea bhag 02
बिझनेस तर करायचा आहे पण काय बिजनेस करू हे ज्यांना सुचत नाही अशांसाठी या आधीची पोस्ट केली होती.
ती जर तुम्ही वाचली नसेल तर #काय_बिझनेस_करू ? भाग 01 सर्च करा. त्याच पोस्टचा दुसरा भाग आज मी लिहितोय.
ज्यांना खरंच व्यवसाय करायचा आहे, अशा नव उद्योजकांनी या आधीच्या पोस्टमध्ये मी दिलेला टास्क नक्कीच सुरू केला असेल.
Startup idea for business :या पुढची स्टेप काय असेल ते पण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
व्यवसाय करणं ही अशी गोष्ट नाही की आल मनात आणि केला व्यवसाय. एखादा व्यवसाय उभा करायचा म्हटलं की त्याला अनेक प्रोसेस मधुन जावं लागतं.
startup idea for students :
ज्यावेळी एखादी व्यवसाय कल्पना अमलात आणायचा विचार करता, त्यावेळी तुम्हाला त्या व्यवसायाच्या बाबतीतील माहिती गोळा करणे आणि त्याच्यावर विश्लेषण पूर्वक अभ्यास करून मगच आपल्याला व्यवसाय सुरु करावा लागतो.
आपण सुरू करणारा व्यवसाय कोणत्या एरियामध्ये आहे, त्या एरियामध्ये आपल्या व्यवसायाला किती स्कोप असू शकेल, आपले संभाव्य ग्राहक नेमके कोण आहेत ते त्या एरियामध्ये किती परसेंटेज असतील, आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रॉफिट मिळवून द्यायला किती वेळ लागेल. आपलं बजेट किती आहे. आपल्या बजेटनुसार आपल्याला प्रॉफिट मिळेपर्यंत आपण या बिजनेस मध्ये टिकून राहू का. या आणि अशा अनेक प्रश्नांची आपल्याला शहानिशा करावी लागते आणि मगच व्यवसाय सुरू करावा लागतो.
आता बऱ्याच जणांच्या डोक्यात आले असेल, की अरे एवढ कुठे असते का ? तर असत, नाहीतर तुम्ही व्यवसाय सुरू करता आणि काही महिन्यातच बंद करून टाकतात.
यावर काही पर्याय आहे का ? माझ्याकडे पैसे खूप आहेत पण कुठे आणि कसे गुंतवावे हेच समजत नाही.
हो यासाठी एक पर्याय आहे, तुमच्याकडे जर इन्वेस्ट करायसाठी फंड असेल तर, तुम्ही फ्रेंचाईज बिजनेस सुरू करू शकता.
फ्रेंचाईज बिजनेस मॉडेल काय असतं हे मी तुम्हाला वेगळे सांगायची काही गरज नाही. मी जर एखादी फ्रेंचाईज घेतली तर मला काय फायदा होईल ते आपण थोडक्यात पुढे पाहूया.
एखाद्या व्यवसायाची फ्रेंचाईजी घेतल्यानंतर आपल्याला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खूप कमी जोखीम असती.
कारण त्या व्यवसायाची आधीच मार्केटमध्ये ब्रँड ओळख झालेली असते.त्यामुळे नवीन व्यवसायाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती या बिझनेस मॉडेल मध्ये खूप कमी असते. ग्राहकाला फक्त त्याच्या मार्केटमध्ये एखाद्या ब्रँडेड कंपनीची फ्रेंचाईजी ची सर्विस उपलब्ध आहे ते समजणं पुरेसं असतं.
नवीन व्यवसाय सुरू करत असताना स्टार्ट-अप साठी लागणारे ॲक्सेसरीज फर्निचर अशा बऱ्याच गोष्टी फ्रॅंचाईज मॉडेलमध्ये फ्रॅंचाईज फी मध्येच असतात त्यामुळे यासाठी एक्स्ट्रा खर्च करावा लागत नाही.
startup idea for women
असे बरेच फायदे फ्रॅंचाईज बिजनेसचे आहेत, तसेच तोटेही आहेत. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
तुम्हाला फ्रंचाईज बिजनेस बद्दल अधिक आणि योग्य मार्गदर्शन हवे असेल तर, खाली मी एक इन्क्वायरी फॉर्म देतोय,तो फॉर्म भरा.फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक व्हाट्सअप लिंक भेटेल त्यावरून तुम्ही Franchise India consultant सीमा रेणापूरकर यांच्याशी व्हाट्सअप चॅट करू शकता.
सीमा रेणापूरकर मॅडम या मागील सोळा वर्षापासून Kidzee ही प्री प्रायमरी स्कूल ची फ्रेंचाईज लातूर शहरांमध्ये यशस्वीरित्या चालवतात. तसेच त्या मागील एक वर्षापासून
Franchise India या भारतातील टॉपच्या फ्रेंचाईज कन्सल्टिंग कंपनीसोबत franchise consultant म्हणून काम करत आहेत.
Franchise Inquiry Form