New Business Ideas Shredded Paper चा व्यवसाय कसा सुरू करायचा?

New Business Ideas Shredded Paper : नमस्कार yashaswiudyog.com या आपल्या Marathi Business Blog Website च्या माध्यमातून आपण नेहमीच नव-नवीन Business ideas ची माहिती घेत असतो. भारतात प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी नंतर अनेक पर्यावरण पूरक उत्पादनांची गरज वाढली आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे सुरु झाले आहे. मार्केटमध्ये या पर्यावरण पूरक उत्पादनांची मागणी वाढत आहे,पण तेवढा पुरवठा करणारे व्यवसाय नाहीत. यातीलच एक व्यवसाय तो म्हणजे Shredded Paper निर्मिती व्यवसाय. आजच्या New business ideas in marathi Shredded Paper चा व्यवसाय कसा सुरू करायचा ? या आर्टिकल मध्ये आपण Shredded Paper Business बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. Shredded paper हे अनेक ऑनलाईन व्यवसायांमध्ये पॅकिंग मटेरियल म्हणून वापरले जाते. ऑनलाईन वेबसाईट्स वर विक्री होणाऱ्या अनेक गिफ्टआर्टिकल्स किंवा कचाकड्याच्या वस्तू पॅकिंगसाठी Shredded paper खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. 2025 पर्यंत Shredded paper $2.86 बिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुम्ही नवीन यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हि योग्य वेळ आहे. चला तर मग  Shredded Paper चा व्यवसाय कसा सुरू करायचा ? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

श्रेडेड पेपर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कुठे होतो ? 

श्रेडेड पेपर म्हणजे काय ?

श्रेडेड पेपर म्हणजे वेस्ट पेपर (रद्दी पेपरचे) छोटे-छोटे तुकडे, कि जे वापरलेली वर्तमानपत्रे, मासिके, वापरलेली कागदे अशा वेगवेगळ्या पेपर रद्दी पासून तयार केली जातात. यासाठी एक विशिष्ट प्रकारची shredding machine वापरली जाते. या प्रक्रियेत पेपरचे छोटे-छोटे तुकडे होत असल्याने रद्दी पेपरचा पुनर्वापर होतो.

New Business Ideas Shredded Paper
New Business Ideas Shredded Paper (Source : Gitty Images)
Where is shredded paper used? श्रेडेड पेपरचा उपयोग कुठे होतो ?

श्रेडेड पेपरचा उपयोग हा ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे मोठया प्रमाणात होतो. या मध्ये विशेषतः गिफ्ट पॅकिंग, हस्तकला साहित्य पॅकिंग करणारे व्यावसायिकांकडून श्रेडेड पेपरची मागणी जास्त असते.

श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसायाचे फायदे

Environmental Complementary Business : पर्यावरण पूरक व्यवसाय

श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय हा एक पर्यावरण पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायात रद्दी पपेरचा पुनर्वापर होत असल्याने आपला हा व्यवसाय पर्यावरणाचे संरक्षण करणारा आहे. थर्माकॉल पर्याय म्हणून व्यावसायिक श्रेडेड पेपर वापरू शकतात याने पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.

Most Demanded Business : सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय

ऑनलाईन विक्रीचे वाढते मार्केट लक्षात घेता श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय हा मोस्ट डिमाण्डेड व्यवसाय आहे. गिफ्ट आर्टिकल किंवा हस्तकला वस्तू विक्री करणारे अनेक व्यावसायिक तुम्हाला तुमच्या स्थानिक मार्केट मध्ये भेटतील. तसंच ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून विक्री करणारे अनेक व्यावसायिक तुम्हाला इंस्टाग्राम वर भेटीला. या सर्वाना तुम्ही प्रत्यक्षत भेटून, कॉलवर किंवा ई-मेल च्या माध्यमातून सपंर्क करू तुम्ही त्यांच्याकडून बिझनेस मिळवू शकता. त्यांना तुम्ही परवडणाऱ्या किमतीत योग्य गुणवतेचा माल वेळेवर पुरवला तर ते तुमचे दीर्घकालीन कस्टमर होतील.

श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे

श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसायात लागणारी गुंतवणूक हि कच्चा माल, मशीनरी, भाडे(व्यवसायासाठीची जागा स्वमालकीची नसेल तर) आणि इतर खर्च यावर अवलंबून आहे. याचा अंदाजे खर्च पुढे पाहू.

मशिनरीचा खर्च :
  • Paper Shredding Machine( पेपर श्रेडिंग मशीन ) : श्रेडिंग पेपर निर्मिती व्यवसायात श्रेडींग पेपर मशीनचा खर्च हा, मशीनच्या क्षमतेनुसार अंदाजे रु ५०००० ते २००००० इतका येऊ शकतो.  या व्यवसायात श्रेडींग मशीन हि मुख्य मशीन आहे. यासोबत तुम्ही आवश्यकतेनुसार आणि बजेट नुसार बेलिंग, कटिंग, पॅकिंग मशीनची खरेदी करु शकता.
  • कचा माल आणि इतर खर्च : या व्यवसायात रद्दी पेपर कचा माल म्हणून उपयोग केला जातो. कच्या मालाच्या सुरवातीच्या खरेदी साठी तुम्हाला साधारण २०००० ते ६०००० रुपये खर्च करावा लागेल. या सोबतच packing मटेरियल, स्टोरेज बीन, स्टिकर्स, लेबल्स,ट्रॉलीस, वजनकाटा इत्यादी वस्तूंसाठी खर्च करावा लागेल. तसेच व्यवसायाची जागा स्वमालकीची नसेलतर भाडे,वीजबिल,पाणी बिल,कामगारांचा पगार इत्यादी इतर खर्चाचा विचार हा व्यवसाय सुरु करताना करणे आवश्यक आहे.
  • एकंदरीत हा व्यवसाय उभारणी साठी रुपये २००००० ते ८००००० खर्च येऊ शकतो.

श्रेडेड पेपर व्यवसाय यशस्वी करण्यासाठी टिप्स

  • उत्तम गुणवतेचे श्रेडेड पेपर निर्माण करून तुम्ही तुमच्या गुणवतेला व्यवसायाची ओळख बनवू शकता.
  • मार्केट मध्ये तुमच्या उत्पादनाची मागणी वाढवण्यासाठी विविध रंगांचे तसेच साईजचे श्रेडेड पेपर तयार करा.
  • नवीन ग्राहक मिळवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम,युट्युब,इंडिया मार्ट, या सारख्या डिजिटल माध्यमांचा उपयोग करा.
अशाच बिझनेस आयडियाच्या आर्टिकल्ससाठी  व्हाट्सअप ग्रुप / टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Join WhatsApp Group 

Join Telegram Channel

Amazon Flipkart Work From Home : ॲमेझॉन फ्लिपकार्ट देत आहेत कामाची संधी, दहावी बारावी पास करू शकतात हे काम

work from home google you need just smartphone : तुमच्याकडे जर स्मार्टफोन आहे तर आता Google वर काम करून कमवा महिना 50000

Agarbatti Packing Business Work from home : घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंगचा व्यवसाय एक उत्तम पर्याय

Leave a Comment