About us

About Us

यशस्वी उद्योग काय आहे ?

यशस्वी उद्योग हि एक Marathi Blogging Website आहे.

नमस्कार मित्रहो!

             टेकनॉलॉजी सारखे तंत्र आज आपल्या हातात आहे. शिक्षणाचा प्रचार व प्रसार चांगला झाल्याने देशातील बहुतांशी लोकसंख्या ही साक्षर झाली आहे. सद्य स्थितीला आपली शिक्षण पद्धती ही काही अंशी नोकरी भिमुक राहिल्याने तसेच नोकरीला सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने सुशिक्षित तरुणवर्ग नोकरीच्या मागे धावतो आहे.
           शिक्षणाचा उपयोग हा फक्त नोकरी करण्यासाठीच नसुन शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून एखादा उद्योग-धंदा उभा करून स्वतःचा रोजगारा बरोबर इतरांना ही काहीतरी रोजगाराची संधी निर्माण करता येवु शकते हे आजच्या तरुणांच्या लक्षात येवुन सुद्धा तो त्याकडे कानाडोळा करताना दिसतोय. परिणामी मोठा तरुण वर्ग स्वतःला बेरोजगार म्हणवून हताश जीवन जगताना दिसत आहे.
           अशा तरुणांना स्वालंबी बनवण्याकरीत Yashaswi Udyog Marathi Blogging Website च्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावे , उद्योगाविषयी त्यांना आवड निर्माण होवुन त्यांनी स्वतः बरोबर समाजासाठी ही रोजगार  निर्मिती करावी यासाठी या blogging Website चा खटाटोप .
          नवउद्योजकांना नवीन उद्योग सुरूकरताना येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू .

 माझ्याबद्दल –

मी स्वप्नील शिंदे, मी मूळचा पडली स्टेशन, कोरेगाव, सातार चा आहे,सध्या पुणे तळेगाव दाभाडे येथे रहातो. खरतर पुण्यात मी २००९ मध्ये नोकरी निमित्त आलो आहे. सध्या मी एका नामांकित कंपनीत जॉब करत आहे.
समाज हिताचे काहीतरी चांगले काम आपल्या कडू व्हावे यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.