कोरोना नंतर अनेकांचे जॉब गेले आहेत, नोकरी मिळाली तरी ती कमी पगाराची मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक जण Online किंवा Offline Work from home काम शोधत आहे. तसेच अनेक गृहिणी आपला घरात आर्थिक हातभार मिळावा म्हणून work from home कामाच्या शोधात आहेत. अशा सर्वांसाठी agarbatti packing Business एक उत्तम पर्याय आहे. Agarbatti Packing Business कसा सुरू करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये घेणार आहोत.
Agarbatti Packing Business Work from home : घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंगचा व्यवसाय एक उत्तम पर्याय
भारत हा एक सांस्कृतिक देश आहे. भारतात पूजाअर्चा करणे हे नित्याचे आहे. कोणते धार्मिक कार्यात विविध धार्मिक साहित्य उपयोगात आणले जाते त्यातीलच एक म्हणजे उदबत्ती ज्यालाच आपण अगरबत्ती सुद्धा म्हणतो किंवा धुपबत्ती सुद्धा म्हणतो. कोणत्याही धार्मिक कार्यात अगरबत्ती असणे आवश्यक असतेच. अगरबत्ती निर्मिती व्यवसाय हा घरच्या घरी करता येण्यासारखा व्यवसाय आहे. घरातील दोन-चार महिला आणि एक पुरुष किंवा एखादा बचत गट हा व्यवसाय घरच्या घरी सुरू करू शकतो. अगरबत्ती हे प्रॉडक्ट नियमित लागणारे आणि फास्ट कंजुमेबल प्रॉडक्ट आहे. त्यामुळे या मालाची मागणी मार्केटमध्ये सातत्याने होत राहते. हा व्यवसाय आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, जसं की अगरबत्ती तयार करणे. अगरबत्ती तयार करण्यासाठी रॉ मटेरियल पुरविणे. किंवा तयार अगरबत्तींचे मार्केटिंग करणे किंवा होलसेल विक्री करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा अगरबत्ती व्यवसाय करू शकता.
Agarbatti Packing Business Work from home
Agarbatti Packing Business : Work From Home अगरबत्ती पॅकिंग व्यवसाय हा तुम्ही साधारण दोन प्रकारे करू शकता एक म्हणजे तयार अगरबत्ती विदाऊट सेंट या तुम्ही होलसेल मार्केट मधुन खरेदी करून त्यात तुम्ही विविध प्रकारच्या सेन्टेड अगरबत्ती तयार करून आकर्षक पॅकिंग मध्ये तुमच्या स्वतःच्या ब्रँड नेमणे मार्केटमध्ये विक्री करू शकता. दुसरा प्रकारे तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा सर्व कच्चामाल आणि मशिनरी स्वतः खरेदी करून तुम्ही अगरबत्तीची गाडी बनवण्यापासून ते पॅकिंग आणि विक्री सर्व कामे तुम्ही स्वतः करू शकता यासाठी तुम्हाला अधिक मनुष्यबाची गरज भासू शकते. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल हा तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल किंवा ऑनलाइन तुम्हाला इंडियामार्ट या वेबसाईटवर अगरबत्ती मेकिंग मशीन आणि कच्च्या मालाचे खूप सारे होलसेलर भेटतील. त्यांच्याकडून तुम्ही कच्चामाल आणि मशिनरी खरेदी करू शकता. सुरुवातीच्या काय दिवसांमध्ये ऑनलाईन व्यवहार करणे शक्यतो टाळा जेणेकरून की तुमची कुठूनही आर्थिक फसवणूक होणार नाही.
हे नक्की वाच : बिझनेस वाढवायचा आहे तर जाणून घ्या, लीडमॅग्नेट स्ट्रॅटजि
Agarbatti Packing Business : market research कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायाचे मार्केट रिसर्च करणे खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही सुद्धा हा अगरबत्ती पॅकिंग व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्याआधी तुम्ही तुमच्या शहरातील मार्केटचा अभ्यास करा. तुमच्या शहरातील दुकान मध्ये कोणत्या प्रकारची अगरबत्ती घेतली जाते त्याचे पॅकेजिंग कसे आहे काय किमती चा मालची खरेदी जास्त केली जाते. मार्केटमध्ये कोणत्या सुगंधित अगरबत्तीची मागणी जास्त आहे याबद्दल माहिती घ्या, आणि यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाची योजना करा.
Agarbatti Packing Business : Quality Product तुम्हाला जर अगरबत्ती व्यवसाय मध्ये तुमचे एक बॅडम तयार करायचा असेल तर तुम्ही देत असलेली अगरबत्ती ही उत्तम दर्जाचीच असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही कोणतीही कॉम्प्रमाईज करता कामा नये. त्यामुळे तुम्ही उत्तम दर्जाच्या अगरबत्ती बनवण्याकडे विशेष लक्ष द्या. गुणवत्ता हीच तुमच्या व्यवसायाची ओळख बनवा.
Agarbatti Packing Business : Packing and Bending मार्केटमध्ये कोणत्याही प्रकार एक ब्रँड नेम मिळवण्यासाठी युनिक ब्रँड नेम आणि विशेष म्हणजे युनिक पॅकेजिंग हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे पॅकेजिंग आणि तुमचे ब्रँड नेम हे तुमच्या अगरबत्तीची मार्केटमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे ब्रँड नेम ठरवताना आणि पॅकेजिंग डिझाईन करताना व्यवस्थित रिसर्च करूनच करा.
Agarbatti Packing Business : Marketing कोणत्याही व्यवसाय मध्ये सेल आणण्यासाठी मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रॉडक्ट निर्मिती बरोबरच मार्केटिंग ही खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या अगरबत्ती प्रॉडक्ट चे मार्केटिंग ऑफलाईन तुम्ही तुमच्या आसपासच्या शहरातील होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांकडे करू शकता. तसेच ऑनलाईन विक्रीसाठी तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट तयार करू शकता. फेसबुक इंस्टाग्राम youtube अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही तुम्ही ऑनलाईन विक्रीसाठी उपयोग करून घेऊ शकता.
Agarbatti Packing Business : Work From Home थोडीशी मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास जॉइंट फॅमिली किंवा बचत गट व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकतात.
अशाच बिझनेस आयडियाच्या आर्टिकल्स साठी खाली दिलेले टेलिग्राम चॅनेल आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Join WhatsApp Group
Join Telegram Channel
मालामाल बनवणाऱ्या 10 बिझनेस Idea : 10 Business Idea For Village
काय बिझनेस करू ? भाग 01: बिझनेस तर करायचा आहे पण काय बिजनेस करायचं हेच सुचत नाहीये.