Amazon Flipkart Work From Home : सध्या प्रत्येकालाच passive income साठी part time job ची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जण work from home काही काम मिळते का यासाठी इंटरनेटवर सतत विविध प्रकारची कामे शोधत राहतो. आजच्या पोस्टमध्ये आपण Amazon Flipkart या भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध E-Commerce company देत असलेल्या work from home job बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
Amazon Flipkart Work From Home : ॲमेझॉन फ्लिपकार्ट देत आहेत घरबसल्या काम, महिना साठ हजार कमावण्याची संधी.
या कामातून तुम्ही नक्कीच महिना कमीत कमी रुपये 60 हजार इतकी कमाई करू शकता. एकदा का तुम्हाला या कामातले स्किल लक्षात आले की तुम्हाला इतर कुठेही नोकरी करायची गरज पडणार नाही याची तुम्हाला गॅरंटी देतो. या कामाबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी ही पोस्ट काळजीपूर्वक संपूर्ण वाचा आणि कामाचे नियोजन करून कामाला सुरुवात करा.
Amazon Flipkart work from home job : कोरोना नंतर भारतात ऑनलाइन खरेदीचे प्रमाण खूपच वाढले आहे. कोरोना नंतर भारतात नवनवीन ई-कॉमर्स कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे Amazon Flipkart सारख्या ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या कंपन्यांना नवीन प्रतिस्पर्धी तयार झाले आहेत. या प्रतिस्पर्धींसोबत मार्केटमध्ये जर टिकून राहायचे तर, Amazon Flipkart नवनवीन marketing strategies वापरतात. त्यापैकीच एका marketing strategies च्या माध्यमातून आपल्याला Amazon Flipkart work from home job ऑफर करत आहेत.
Amazon Flipkart work from home job
याला काही वयाची अट आहे का? कमीत कमी शिक्षण किती हवा आहे? कोण या कामासाठी अप्लाय करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे घेऊया.
याला काही वयाची अट आहे का ?
तर नाही याला कोणतीही वयाची अट नाही. ज्याला थोडाफार इंग्रजी वाचता येत आहे, तुझ्याकडे इंटरनेट असतील ना एक अँड्रॉइड फोन आहे, आणि facebook, instagram, youtube सारख्या Social Midea प्लॅटफॉर्मवर जे सक्रिय आहेत, अशा सर्व वयोगटातील व्यक्ती हे काम करू शकतात.
कमीत कमी शिक्षण किती हवा आहे ?
तर वरच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे या कामासाठी कोणतीही वयाची आणि शिक्षणाची अट नाही फक्त थोडेफार इंग्रजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे तसेच ती व्यक्ती सोशल मी प्लॅटफॉर्मवर सक्रिय असणं महत्त्वाचं आहे.
Amazon Flipkart work from home job opportunity for student housewife working profession and retired person.
कोण या कामासाठी अप्लाय करू शकतो ?
तर वरच्या दोन प्रश्नांच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे ज्याच्याकडे इंटरनेट असलेला अँड्रॉइड फोन आहे, जी व्यक्ती सोशल मीडिया म्हणजेच facebook, instagram, youtube वर सक्रिय आहे. आणि ज्याला इंग्रजीचे थोडेफार बेसिक ज्ञान आहे अशी कोणतीही व्यक्ती जी स्टुडन्ट असू शकते, हाऊस वाइफ असू शकते, वर्किंग प्रोफेशनल असू शकते, व्यवसायिक असू शकते, किंवा रिटायर पर्सन असू शकते. त्यामुळे या कामाला कोणत्याही प्रकारचे वय शिक्षणाची अट नाही. फक्त या कामातील स्किल समजून घेऊन त्यानुसार काम करणे महत्त्वाचे आहे. तर मग Amazon Flipkart work from home job : नेमकं काय आहे ते पुढे पोस्टमध्ये समजून घेऊ.
Amazon Flipkart work from home job opportunity
आजच्या 5G च्या युगात इंटरनेटवरून पैसे कोणाच्या ढेपर संधी उपलब्ध आहेत. त्यापैकी योग्य संधी पर्यंत आपण पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे. त्यापैकीच एक संधी आपण आजच्या या पोस्टमध्ये समजून घेत आहोत, Affiliate Marketing ही एक इंटरनेटवरनं पैसे कमावण्याची प्रचलित आणि प्रभावी संधी आहे. याच Affiliate Marketing च्या माध्यमातून हजारो लोक लाखो नाहीतर करोडो रुपये कमवतात. पुढे पोस्टमध्ये Affiliate Marketing काय आहे ? हे समजून घेऊया.
What is Affiliate marketing : एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?
घरबसल्या कमाईची चांगली संधी म्हणजे Affiliate Marketing.
Affiliate Marketing हे असे एक ऑनलाईन काम आहे, ज्यामध्ये तुम्ही Amazon, Flipkart च्या उत्पादनांची जाहिरात करून कमिशन मिळवता. हे काम करणे अगदी सोपे आहे आणि कमी खर्चात करता येते.त्यामुळे हजारो लोकांनी यातून चांगली कमाई केली आहे.
Affiliate Marketing मध्ये आपण Facebook Instagram, YouTube किंवा Blog post च्या माध्यमातून वेबसाइट किंवा सोशल मीडियावर उत्पादनांची जाहिरात करतो. आपल्याला एक Affiliate Link दिली जाते, त्या लिंक च्या माध्यमातून विक्री झाल्यास तुमच्याकडून त्या प्रॉडक्टची विक्री झाली आहे याची ओळख होते.
उदाहरणार्थ : तुम्ही एक ब्लॉग पोस्ट लिहून त्यात एखाद्या प्रॉडक्टची लिंक दिली आणि वाचकांनी त्या लिंकवर क्लिक करून ते उत्पादन खरेदी केले, तर तुम्हाला त्या विक्रीवर कमिशन मिळते.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक Niche निवडावी लागेल. म्हणजेच, एखाद्या विशिष्ट विषयावर आपली वेबसाइट किंवा ब्लॉग असेल किंवा युट्युब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज असेल तर, तुम्ही त्या Niche संबंधित Products निवडून त्यांच्या जाहिराती करता. Amazon, Flipkart, Myntra यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे अफिलिएट प्रोग्राम्स आहेत, ज्या तुम्हाला त्यांची उत्पादने जाहिरात करण्याची संधी देतात. Affiliate Marketing मध्ये यशस्वी होण्यासाठी, नियमित आणि गुणवत्तापूर्ण Content लिहिणे किंवा व्हिडिओ तयार करणे महत्त्वाचे आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये वाचकांसाठी किंवा युट्युब फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवत असाल तर व्हिडिओच्या माध्यमातून उपयुक्त माहिती द्या आणि त्यांच्यासोबत विश्वासार्हता निर्माण करा. अफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता, फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
Amazon Flipkart Myntra या कंपनीमध्ये affiliate marketing साठी registration कसे करायचे ते आता आपण पुढे पाहू.
Amazon, Flipkart, Myntra कंपन्यांच्या official वेबसाईटवर absolute marketing ची लिंक असते तिथून आपण या कंपन्यांच्या affiliate marketing प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. पण या कंपन्यांचे काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात आणि बऱ्याचदा आपण त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये बसत नसल्यामुळे आपल्याला या affiliate marketing मध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही. पण यावर एक पर्याय आहे, earnkro.com ही वेबसाईट किंवा App.
ही वेबसाईट किंवा एप्लीकेशन हे Amazon,Flipkart,Myntra अशा वेगवेगळ्या एकूण 100 पेक्षा जास्त कंपन्यांसोबत Affiliate Marketing Platform म्हणून काम करत आहे. या प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करणे आणि काम करणे अगदी सोपे आहे.