Work From Fome Amazon Job : घरबसल्या ॲमेझॉन सोबत काम करण्याची संधी. अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत ते घरबसल्या नोकरीसाठी ऑनलाइन काम शोधत राहतात. आजच्या पोस्टमध्ये आपण Amazon कंपनीसाठी घरबसल्या virtual customer support assistant पदासाठी Apply कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत.तुम्ही जर ॲमेझॉन पात्र निकषांमध्ये बसत असाल तर नक्की तुमच्यासाठी की लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी असणार आहे. काळजीपूर्वक नक्की वाचा.
Amazon Work From Home Virtual Customer Support Assistant : घरबसल्या ॲमेझॉन सोबत काम करण्याची संधी
Virtual Customer Support Assistant म्हणून तुम्ही काय काम कराल ? Amazon work from home for students
Virtual Customer Support Assistant चे काम करताना तुमच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील:
1.ग्राहकांच्या चौकशींना उत्तर देणे :
– ईमेल, चॅट, आणि फोन कॉलद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देणे.
– उत्पादनांची माहिती, ऑर्डर स्थिती, आणि रिटर्न प्रक्रियेबद्दल ग्राहकांना मदत करणे.
2.समस्या सोडवणे :
– ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण करणे.
– ग्राहकाल्प सेवा नियमांचे पालन करत ग्राहकांच्या अडचणी सोडवणे.
3.ऑर्डर व्यवस्थापन :
– ऑर्डर प्रक्रिया, रिटर्न आणि रिफंडच्या बाबतीत ग्राहकांना मार्गदर्शन करणे.
– ऑर्डरच्या स्थितीबद्दल अद्ययावत माहिती पुरवणे.
4.गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करणे :
– ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रामाणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे.
– प्रत्येक संवादामध्ये ग्राहक संतोष आणि समाधान याची खात्री करणे.
5.डेटा एंट्री आणि दस्तऐवजीकरण :
– ग्राहकांच्या संवादांचा डेटा व्यवस्थापन प्रणालीमध्ये नोंद करणे.
– आवश्यक तितकी माहिती योग्यरित्या नोंदवणे आणि तिचे दस्तऐवजीकरण करणे.
6.सतत शिकणे आणि सुधारणा :
– नवीन उत्पादने, सेवा, आणि प्रक्रिया याबद्दल अद्ययावत राहणे.
– सतत शिकण्याची आणि आपल्या सेवेत सुधारणा करण्याची तयारी ठेवणे.
अशा प्रकारे, Virtual customer support Assistant म्हणून, तुमचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करणे आणि त्यांच्या अनुभवाला अधिक समाधानकारक बनवणे असेल.
What strengths will you bring? या कामासाठी तुमच्याकडे कोणती गुणवत्ता असणे आवश्यक आहे याबद्दल पुढे आपण माहिती घेऊ.
Amazon Work From Home – Virtual Customer Support Assistant
Amazon Virtual Customer Support Assistant म्हणून, खालील गुणधर्म तुमच्या कडून अपेक्षित असतील :
1.उत्कृष्ट संवाद कौशल्य :– स्पष्ट, प्रामाणिक, आणि विनम्र पद्धतीने ग्राहकांशी संवाद साधण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
– ईमेल, चॅट, आणि फोनवर प्रभावीपणे संवाद साधणे या गोष्टीचे तुम्हाला उत्तम ज्ञान असले पाहिजे.
2.समस्या सोडवण्याची क्षमता :
– ग्राहकांच्या तक्रारी आणि समस्यांचे तत्परतेने आणि कार्यक्षमतेने निराकरण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे.
– वेगवेगळ्या समस्यांचे विश्लेषण करून त्यांचे योग्य निराकरण शोधणे तुम्हाला जमणे अपेक्षित आहे.
3.संवेदनशीलता आणि सहानुभूती :
– ग्राहकांच्या अडचणींना संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने समजून घेणे गरजेचे आहे.
– ग्राहकांच्या भावनांना ओळखून त्यांच्या अनुभवाला अधिक समाधानकारक बनवणे तुमचे काम आहे.
4.धीर आणि संयम :
– विविध प्रकारच्या ग्राहकांना संभाळताना धीर आणि संयम ठेवणे आवश्यक आहे.
– तणावग्रस्त परिस्थितीतही शांत राहून ग्राहकांना मदत करणे अपेक्षित आहे.
5.तांत्रिक कौशल्य :
– ग्राहक सेवा सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे.
– वेगवेगळ्या ऑनलाइन टूल्सचा वापर करून कार्यक्षमतेने काम करणे तुम्हाला जमले पाहिजे.
6. वेळ व्यवस्थापन :
– वेगवेगळ्या कामांच्या प्राधान्यानुसार योग्य वेळ व्यवस्थापन करणे.
– ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता.
7.टीमवर्क :
– सहकाऱ्यांशी सहकार्याने काम करण्याची क्षमता.
– टीममध्ये काम करताना सकारात्मक आणि सहकार्यशील दृष्टिकोन ठेवणे.
8.स्वयंप्रेरणा :
– स्वतःहून काम करण्याची आणि जबाबदारी घेण्याची तयारी.
– नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि सतत सुधारणा करण्याची इच्छाशक्ति.
हे सर्व गुणधर्म तुमच्या कडून Amazon Virtual Customer Support Assistant म्हणून अपेक्षित असतील, जेणेकरून तुम्ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करू शकता आणि कंपनीच्या यशामध्ये योगदान देऊ शकता.
Amazon Virtual Customer Support Assistant Job
Amazon Virtual Customer Support Assistant नोकरी मध्ये तुम्हाला मिळणारे फायदे
Amazon Virtual Customer Support Assistant म्हणून काम केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील:
1.वर्क फ्रॉम होम सुविधा :
– घरी राहून काम करण्याची संधी, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रवासाचा त्रास होणार नाही.
– घरच्या आरामदायी वातावरणात तुम्हाला काम करता येते.
2.लवचिक कामाचे तास :
– लवचिक कामाच्या तासांचे व्यवस्थापन, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार काम करू शकता.
– काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन साधण्याची संधी.
3.स्पर्धात्मक वेतन :
– या कामाच्या माध्यमातून बाहेर जाऊन ऑफिस काम करण्याच्या तुलनेत घरी बसून चांगले वेतन आणि विविध प्रकारच्या भत्त्यांचा लाभ मिळेल.
-या कामात तुम्ही उच्च गुणवत्तेचे काम केल्याबद्दल बोनस आणि इतर प्रोत्साहन तुम्हाला मिळत राहतील.
4. वैद्यकीय लाभ :
– या कामाच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असलेल्या आरोग्य विमा योजना माध्यमातून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य संरक्षित होईल.
– विविध आरोग्य सेवा आणि वैद्यकीय तपासण्यांची सुविधा या कामाचे माध्यमातून तुम्हाला भेटेल.
5.प्रोफेशनल विकास :
– या कामातून तुम्हाला प्रशिक्षण कार्यक्रम आणि कौशल्य विकासाच्या संधी भेटेल.
– तुमची कामाची गुणवत्ता चांगली असेल तर करियर ग्रोथ आणि प्रोमोशन नक्कीच तुम्हाला भेटेल.
6.प्रवास खर्च :
-हे काम घरी बसून केल्याने प्रवासाच्या खर्चाची बचत या कामातून होईल.
– तसेच वेळ आणि पैसा दोन्हींची बचत या कामातून होईल.
7.कर्मचारी सवलती :
– तुम्ही ॲमेझॉन चे अधिकृत एम्पलोयी असल्यामुळे Amazon च्या उत्पादनांवर विशेष कर्मचारी सवलती या कामातून तुम्हाला मिळू शकते.
– तसेच Amazon च्या इतर सेवांचा विशेष लाभ या कामातून तुम्हाला भेटेल.
8.टीम सहयोग :
– या कामांमध्ये तुम्हाला ॲमेझॉनच्या उत्कृष्ट आणि सहकार्यशील टीममध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
-या कामात तुम्ही सीनियर असिस्टंटच्या नियमित संपर्कात असल्यामुळे अनुभवसंपन्न सहकाऱ्यांपासून नवीन गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला या कामातून भेटणार आहे.
9.आराम आणि सुविधा :
Amazon Virtual Customer Support Assistant नोकरीमध्ये
– हे काम Work from home असल्यामुळे घरच्या सोयीस्कर वातावरणात काम करून तुम्हाला आरामदायी वातावरण भेटेल.
– या कामातून तुम्हाला ऑफिसला जाण्याच्या गडबडीतून मुक्ता भेटेल.
हे सर्व फायदे तुम्हाला Amazon Virtual Customer Support Assistant नोकरी मध्ये मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम उत्कृष्टपणे करू शकता आणि तुमच्या करियरमध्ये उत्तम प्रगती साधू शकता.
मूलभूत पात्रता
या कामासाठी तुमच्याकडे खालील मूलभूत पात्रता आहे?
– किमान वय: 18 वर्षे
– तुम्ही भारतीय असणे किंवा भारतात काम करायचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
– इंग्रजीमध्ये मजबूत संभाषण कौशल्ये (लिखित आणि तोंडी प्रवाह दोन्ही)
– सोमवार ते रविवार कामकाजाच्या तासांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम काम करण्याची तुमची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
– रोटेशन शिफ्टमध्ये काम करण्याची इच्छा आणि क्षमता (म्हणजे लवकर, उशीरा, रात्रभर, शनिवार व रविवार आणि आवश्यकतेनुसार ओव्हरटाईम)
– तुम्हाला एक शांत, विचलित न होणारी कामाची जागा आवश्यक आहे.
– तांत्रिक दृष्टीकोनातून, हार्ड-वायर इथरनेट इंटरनेट कनेक्शन वापरून 20MB डाउनलोड गती आणि 8MP अपलोड गतीचे किमान ब्रॉडबँड कनेक्शन (WIFI नाही).
तुम्हाला किती पगार मिळेल Amazon च्या Virtual Customer Support Assistant या जॉब पोस्ट साठी ॲमेझॉन कडून वार्षिक 3.5 लाख रुपये इतकी सॅलरी ऑफर केली जाते.
How to Apply Amazon Virtual Customer Support Assistant Job Apply
या कामासाठी अप्लाय कसे कराल?
Amazon Virtual Customer Support Assistant Job Apply खाली दिलेली प्रोसेस फॉलो करा.
1. खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा.
Apply Now
2. तुमच्या समोर आता amazonjob हे पेज ओपन होईल.
या पेजवर केसरी रंगाच्या चौकोनात दिसत असलेल्या Apply Now वर क्लिक करा. या पेजवरील जॉब बद्दलची सविस्तर माहिती वाचून घ्या.
3. आता तुम्ही पुढच्या पेजवर आल्यावर तुम्हाला तीच माहिती पुन्हा दिसेल, ते पेज खाली स्क्रोल करा. खाली तुम्हाला I Accept आणि I Decline हे दोन ऑप्शन दिसतील. त्यापैकी I Accept या ऑप्शनसमोरील बोलावर क्लिक करून. त्या खाली दिलेल्या Continue ऑप्शन वर क्लिक करा.
4. पुढे तुम्हाला लॉगिन चे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
या ठिकाणी तुमचे लॉगिन होत नसेल तर, त्याखालीच दिलेल्या Create One ऑप्शन वर क्लिक करून तुमचे अकाउंट क्रिएट करून घ्या. पुन्हा लॉगिन करा.
5. लॉगिन झाल्यानंतर ना आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे जोडून तुम्ही तुमचे एप्लीकेशन सबमिट करा.
Amazon Flipkart Work From Home : ॲमेझॉन फ्लिपकार्ट देत आहेत कामाची संधी, दहावी बारावी पास करू शकतात हे काम
काय बिझनेस करू ? भाग 02: बिझनेस तर करायचा आहे पण काय बिजनेस करायचं हेच सुचत नाहीये.