Business Idea : फेकून दिलेल्या शहाळ्याच्या साली करून देतील दिवसाला रु. 20 ते 30 हजार कमाई
Business Idea : आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण ज्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत त्या व्यवसायासाठीचा आवश्यक कच्चामाल महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही, हा व्यवसाय महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे या व्यवसायातून तयार होणारे प्रॉडक्ट खरेदी करणारे ग्राहक हे महाराष्ट्रातच जास्त प्रमाणात आहेत. हा व्यवसाय करणारे प्रामुख्याने केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिला भेटतात. तसेच सध्या महाराष्ट्रात कोकणात आणि इतर शहरात ही हा व्यवसाय करणारे व्यवसायिक तयार होत आहेत. या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे पण निर्माण करते कमी आहेत. तुम्ही Business च्या शोधात असाल तर नक्कीच या व्यवसायाचा विचार तुम्ही करायला हवा. या व्यवसायातून एका छोट्या युनिटच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये नक्कीच कमवू शकता. चला तर मग या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.