Business Idea : नमस्कार Yashaswiudyog.com या आपल्या Business Blog वेबसाईटवर आपल्या सर्वांचे खूप-खूप स्वागत. नेहमीप्रमाणेच आज आपण एक युनिक आणि तुमच्या शहरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या नारळ पाण्याच्या वेस्ट पासून, सालीपासून लाखोंची कमाई करून देणारा बिजनेस पाहणार आहोत. तुम्ही जर कोकणातील असात आणि तुमची बिझनेस करण्याची इच्छा असेल तर, ही पोस्ट तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. कारण कोकणातील व्यक्तींनी तर हा बिजनेस करणे आहेच आहे. कोकणात या बिझनेससाठी लागणारा कच्चामाल हा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे कोकणातील व्यक्तींनी तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नक्कीच पुढाकार घ्यावा. चला तर मग वेळ न घालवता या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.
Business Idea : आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण ज्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत त्या व्यवसायासाठीचा आवश्यक कच्चामाल महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही, हा व्यवसाय महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे या व्यवसायातून तयार होणारे प्रॉडक्ट खरेदी करणारे ग्राहक हे महाराष्ट्रातच जास्त प्रमाणात आहेत. हा व्यवसाय करणारे प्रामुख्याने केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिला भेटतात. तसेच सध्या महाराष्ट्रात कोकणात आणि इतर शहरात ही हा व्यवसाय करणारे व्यवसायिक तयार होत आहेत. या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे पण निर्माण करते कमी आहेत. तुम्ही small business च्या शोधात असाल तर नक्कीच या व्यवसायाचा विचार तुम्ही करायला हवा. या व्यवसायातून एका छोट्या युनिटच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये नक्कीच कमवू शकता. चला तर मग या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.
Business Idea : Cocopeat and coir fiber rope manufacturing
Business Idea : आपण ज्या व्यवसाय बद्दल बोलत आहोत तो व्यवसाय म्हणजे Coco peat manufacturing business आणि Coir fiber rope ( काथ्या ) manufacturing business. हा व्यवसाय करण्यासाठी रॉ मटेरियल कुठे भेटेल, कोणकोणत्या मशीनस् ची आवश्यकता आहे, तयार झालेले प्रॉडक्ट कुठे विक्री करायचे आणि या व्यवसायासाठी किती भांडवल लागेल याबद्दल सविस्तर माहिती पुढे घेणार आहोतच पण त्या आधी cocopeat आणि fiber rope बद्दल थोडक्यात माहिती घेऊया
Cocopeat म्हणजे काय ?
नारळाच्या सालीपासून वेगवेगळी उत्पादने तयार केली जातात त्यापैकीच एक म्हणजे कोकोपीट. कोकोपीट हे नारळाच्या सालींवर प्रोसेस करून म्हणजेच वेगवेगळ्या मशनरीच्या साह्याने नारळाच्या सालींमध्ये असलेले वेगवेगळे घटक वेगवेगळे करून कोकोपीट तयार केले जाते. कोकोपीट मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे नर्सरी किंवा ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये मातीच्या ऐवजी झाडे निर्मितीसाठी कोकोपीट चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कोकोपीट च्या साह्याने झाडांची मुळे मजबूत होतात आणि झाडांची वाढ लवकर होते. लँडस्केपिंग, गार्डनिंग, नर्सरी आणि ग्रीन हाऊस मध्ये तसेच हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कोकोपीट चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे कोकोपीटला सध्या आणि यापुढेही खूप चांगले मार्केट असणार आहे. तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते. कोकोपीट निर्मिती व्यवसाय कसा सुरू करायचा त्याची उत्पादन प्रक्रिया नेमकी काय आहे त्यात पुढे पोस्टमध्ये आपण पाहूच.
Coir fiber rope म्हणजे काय ?
Cocopeat manufacturing process मध्येच cocopeat आणि coir fiber हे वेग-वेगळे होतात. या प्रोसेस मध्ये वेगळे झालेले coir fiber हे डोअर मॅट, गाद्या, सोपे निर्मिती व्यवसायात उपयोगात आणले जातात. हेच coir fiber का विशिष्ट मशीनच्या साह्याने एकत्रित करून त्यापासून रोप तयार केला जातो. यालाच आपण काथ्या ( coir fiber rope) म्हणून ओळखतो.
Cocopeat and coir fiber rope manufacturing process
Cocopeat manufacturing process ही मुख्यतः चार टप्प्यांमध्ये विभागली जाते.
1) Raw material collection and preparation 2) Cocopeat and fiber extraction 3) Fiber willowing 4) draying and packing
- raw material collection and preparation : या पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला रॉ मटेरियल कलेक्शन आणि प्रिपरेशन करायचे आहे. आपल्या शहरातील शहाळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे आपल्याला शहाळे पिऊन फेकून दिलेले वेस्ट हे आपले रॉ मटेरियल आहे. दररोज तुम्हाला संध्याकाळी आपल्या शहरातील शहाळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून हे रॉ मटेरियल कलेक्ट करायचे आहे. आपल्या फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर हे वेस्ट काही दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत ज्यामुळे कडक असणाऱ्या नारळाच्या साली मऊ होऊन पुढील प्रोसेस साठी त्या तयार होतात.
- Cocopeat and fiber extraction : पुढच्या प्रोसेस मध्ये fiber extraction machine मध्ये रॉ मटेरियल टाकून प्रोसेस केले जाते. या प्रोसेस मध्ये आपल्याला कोकोपीट आणि फायबर मिळतात. हे कोकोपीट आणि फायबर screener machine मध्ये टाकून चाळले जाते. आपल्याला उत्तम क्वालिटीचे आणि फाईन असे कोकोपीट,फायबर मिळते.
- Fiber willowing : Fibre extraction machine मध्ये वेगळे झालेले coir fiber पुढच्या प्रोसेस मध्ये willowing मशीनच्या साह्याने तीन वेगवेगळ्या साईज मध्ये वेगळे केले जाते. Baby coir, Fine fibre, Waste fibre. यातील फाईन फायबर रोप मेकिंगमशीन मध्ये टाकून त्यापासून रोप तयार केला जातो. ज्याला आपण काथ्या म्हणून ओळखतो.
तयार माल कुठे विकायचा
तयार कोकोपीट हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विक्री करू शकता ऑफलाइन विक्री करायची झाली तर ग्रीन हाऊस, पॉलिहाऊस, हायड्रोपोनिक फार्मिंग, मशरूम फार्मिंग, नर्सरी अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये सध्या महाराष्ट्रात खूप मागणी आहे. संबंधित व्यवसायकांशी तुम्ही संपर्क करून कोकोपीटची विक्री करू शकता. ऑनलाइन विक्री करायची तर इंडिया मार्ट, एक्सपोर्ट इंडिया, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मोगलीक्स, ट्रेड इंडिया, ग्लोबल सोर्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचा बिजनेस रजिस्टर करून तुम्ही तुमच्या मालाची विक्री करू शकता.
तसेच फायबर रोप काथ्या हा तुम्ही ऑफलाइन मध्ये तुमच्या शहरातील,जिल्ह्यातील,राज्यातील हार्डवेअरच्या दुकानांमध्ये तुम्ही ते विक्री करू शकता, विविध होलसेलरकडे तुम्ही विक्री करू शकता, मंडप डेकोरेटर त्यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता, शेतीमाल विक्रेते त्यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता आणि ऑनलाइन म्हणाल तर वरती दिलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर कोकोपीट सोबत तुम्ही फायबर रोप विक्री करू शकता.
हे नक्की वाच :
Business Idea : घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंगचा व्यवसाय एक उत्तम पर्याय
Business Idea : श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय व्यवसाय कसा सुरू करायचा?
अशाच बिझनेस आर्टिकल्ससाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Join WhatsApp Group
या बद्दल डिटेल माहितीसाठी खालील युट्युब व्हिडीओ पाहू शकता.