How to start online business 5 Steps Process : Online Business कसा सुरू करायचा ?

How to start online business : वेबसाईट बनवली म्हणजे ऑनलाइन बिजनेस सुरू झाला असं नाही. Amazon Flipkart वर आपला Business registretion केला म्हणजे Onlie]ne Business सुरू झाला असं नाही. Facebook, instagram, Google वर ॲडवटाईजमेंट करणं म्हणजे Online Business असं नाही. नमस्कार Yashaswi Udyog Business Blog Website च्या माध्यमातून नेहमीच आपण वेगवेगळ्या Uniqu Business Ideas बद्दल माहिती घेत असतो. आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण Online Business कसा सुरू करायचा ? याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण Online Business कसा सुरू करायचा याबद्दलची जास्तीत जास्त माहिती थोडक्यात कशी समजून देता येईल याचा मी प्रयत्न करेन. चला तर मग सुरुवात करूया.

How Online Business Work ? ऑनलाइन बिझनेस नेमका कसा करतात ?

ऑनलाइन बिजनेस ची एक वेगळीच दुनिया असते, ऑनलाइन बिजनेस ऑफलाईन बिझनेस पेक्षा खूपच वेगळे असतात. ऑफलाइन बिजनेस मध्ये मार्केट हे आधीच तयार असते फक्त आपल्याला त्या मार्केटमध्ये आपल एक ऑफलाइन दुकान सुरू करावा लागते, पण ऑनलाइन बिजनेस मध्ये तसं नसतं ऑनलाईन बिझनेस सुरू करण्याआधी तुम्हाला तुम्ही विक्री करत असलेले प्रॉडक्ट संबंधित किंवा सर्विसंबंधीत मार्केट तयार करावे लागते ऑडियन्स तयार करावा लागतो. थोडसं सविस्तर समजून घेऊ मला माझा एक ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा आहे व्यवसाय मला indoor Plants ऑनलाईन विकायचे आहेत. तर यासाठी मी कशाप्रकारे ऑडियन्स किंवा मार्केट शोधणार. त्यासाठी मला आधी स्टडी करावा लागेल की इंडोर प्लांट्स खरी करणारे किती पर्सेंट लोक आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे इंडो प्लांट्स आवडतात की किती कमिटीपर्यंतचे प्लांट खरेदी करू शकता या सगळ्यांबद्दल अभ्यास करून मी माझ्या व्यवसाय सुरू करायला प्रयत्न करणार. फेसबुक, इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया किंवा गुगल यासारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी ऑनलाईन व्यवसाय करू इच्छित असलेल्या बिजनेस मध्ये इंटरेस्टेड लोक किती आहेत आणि मी कशाप्रकारे त्यांना माझ्या बिजनेस मध्ये इन्व्हॉल करून घेऊ शकतो मी त्यांना कस्टमर बनू शकतो मी त्यांना सेल करू शकतो याबद्दल अभ्यास करणं स्टडी करणं खूप महत्त्वाचा आहे. ऑनलाइन बिजनेस मध्ये एकदा का तुम्हाला तुमचा कस्टमर बेस्ट कळाला कस्टमरची नीट कळाली की मग तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिस हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शोकेस करावे लागतात, आणि त्यानंतर न मग आपल्याला आपला सेल्स चॅनेल तयार करावा लागतो. फक्त आपण वेबसाईट बनवली म्हणजे झालं, ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर बिझनेस रजिस्टर केला म्हणजे झालं तर मुळात असं नाही. यातून तुमचा सेल्स जनरेट होणार नाही.

या पुढचे आर्टिकल अगदी लक्षपूर्वक वाचा.

5 Steps to start online business
5 Steps to start online business

कोणता ही ऑनलाइन बिजनेस किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक 5 Steps Process फॉलो कने खूप महत्त्वाचा आहे. पुढे मी तुम्हाला ती 5 Steps Process  काय आहे? ती सविस्तर सांगणार आहे तर आर्टिकल लक्षपूर्वक वाचा.
First step : build community
Second step : Generate Database
Third step : create sales plan
Fourth step : launch product
Fifth step : Retargetting

पुढे प्रत्येक स्टेप सविस्तर समजून घेऊया.
How to start online business first step : build community : आपल्याला जर ऑनलाइन बिजनेस करायचा आहे तर पहिल्यांदा आधी आपली कम्युनिटी बिल्ड करावी लागेल. कम्युनिटी म्हणजे तुम्ही जी सर्विस, जे प्रॉडक्ट ऑनलाईन सेल करणार आहे ते खरेदी करणारा ऑडियन्स तुम्हाला तयार करावा लागेल, तयार करावा म्हणजे नेमकं काय करायचं तर तुमच्या सर्विस किंवा प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्टेड असणारे ग्राहक तुम्हाला एखाद्या सोशल पेजवर असं फॉलो करून तुम्हाला एकत्रित आणावं लागेल. या ठिकाणी तुम्ही युट्युब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज किंवा इतर सोशल पेजेसचा तुम्ही वापर करू शकता. तुमची स्वतःचे सोशल पेज जर तयार नसेल किंवा ते बिल होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर तुम्ही इतरांचे सोशल पेजेस सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या बिझनेससाठी तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसच्या प्रमोशनसाठी तुम्ही उपयोग करू शकता. एकदा का तुम्हाला तुमचा अपेक्षित ग्राहक ह्या सोशल पेज च्या माध्यमातून मिळाला की तुम्हाला तुमचे सर्विस प्रॉडक्ट सेल करण्यासाठी खूप सोपे जाईल. म्हणूनच ऑनलाईन बिजनेस करण्यासाठीची पहिली स्टेप ती म्हणजे ऑडियन्स बिल्ड करने. थोडास अजून सविस्तर समजून घेऊया. तुम्ही हे जे आर्टिकल वाचत आहात ते तुम्ही माझ्या yashaswiudyog.com या माझ्या बिझनेस ब्लॉक वेबसाईटवर वाचत आहात. हे माझं प्रॉडक्ट आहे. हे आर्टिकल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यासाठी माझ्या फेसबुक पेज चा खूप मोठा वाटा आहे. कदाचित तुम्ही हे आर्टिकल फेसबुक पेजच्या माध्यमातून तुलाच वाचत असाल. म्हणजेच काय तर मी फेसबुक पेजच्या माध्यमातून मी माझा एक ऑडियन्स बेस तयार केला ग्राहक तयार केला आणि त्यानंतर मी आर्टिकल वेबसाईटवर लिहून त्या आर्टिकल मी फेसबुक पोस्ट माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले. First step : build community ऑनलाईन बिझनेस सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

How to start online business second step : Generate Database : ऑनलाइन बिजनेस सुरु करण्यासाठी ची दुसरी स्टेप ती म्हणजे Generate Database. डेटाबेस जनरेट करायचा म्हणजे नेमकं काय ते या स्टेपमध्ये आपण सविस्तर समजून घेऊया. आपण वरचेच उदाहरण पुढे कंटिन्यू करूया जसं की आपण हे आर्टिकल वाच आहात ते आपल्या यशस्वी उद्योग या बिझनेस ब्लॉग वेबसाईटवरचे आर्टिकल आहे. हे आर्टिकल तुमच्यापर्यंत पोचले कारण कदाचित तुम्ही माझे फेसबुक पेज फॉलो केले‌ आहे किंवा माझ्या वेबसाईट वरचे पोस्ट नोटिफिकेशन तुम्ही ऑन केले आहे किंवा तुम्ही माझ्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन आहात किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन आहात. वरती उल्लेख केलेले सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे माझ्यासाठीचे डेटाबेस जनरेट करणारे लँडिंग पेज आहेत. ज्याच्या माध्यमातून मी माझे आर्टिकल्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. थोडक्यात काय तर, माझ्या आर्टिकल बद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मी तयार केलेल्या लँडिंग पेजवर तुम्ही आल्यामुळे माझ्यासाठी तो एक डेटाबेस तयार झाला. डायरेक्टली जरी तुमचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे नसले तरी इनडायरेक्टली मी माझे प्रॉडक्ट जसं की माझं ब्लॉक वेबसाईट आहे, माझे ब्लॉग  हे या फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज किंवा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. अशाच पद्धतीने तुम्हालाही तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी या सोशल मीडिया पेजेसचा, ग्रुपचा, चॅनल चा उपयोग करून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी डेटाबेस तयार करायचा आहे.

अशाच बिझनेस आयडियाच्या आर्टिकल्ससाठी  व्हाट्सअप ग्रुप / टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Join WhatsApp Group 
Join Telegram Channel

How to start online business third step : Create Sales Channel : सेल्स चॅनेल तयार करणे ही ऑनलाईन बिझनेस मधली तिसरी आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे. कारण या स्टेप मध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस सेल करूनच तुम्ही तुमची अर्निंग जनरेट करू शकता. ज्यासाठी तुम्ही हा ऑनलाइन बिजनेस उभा केला आहे. बरेच ऑनलाईन व्यवसाय करू इच्छिणारे लोकं ही स्टेप सगळ्यात आधी करतात. म्हणजे काय तर ते त्यांची ऑनलाइन एक वेबसाईट तयार करतात आणि लीड्स न आल्यामुळे, सेल जनरेट न झाल्यामुळे ते त्यांचे व्यवसाय काही दिवसातच बंद करतात. हे थोड आपण पुढे सविस्तर समजून घेऊया. Sales channel हे मुळात दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे Automated Seles Channel आणि दुसरा म्हणजे Manual Sales Channel.

Automated Seles Channel : तयार करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट तयार करावी लागते आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सर्विस ऑटोमॅटिक सेल करू शकता. Manual Sales Channel : तयार करण्यासाठी तुमच्या व्हाट्सअप बिझनेस च्या माध्यमातून तुम्ही तयार करू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा ऑनलाईन बिझनेस सुरू करताना सुरुवात ही मॅन्युअल सेल्स चॅनेल च्या माध्यमातूनच करा, म्हणजे काय तर तुम्ही तुमचा व्हाट्सअप बिजनेस चा उपयोग करूनच तुम्ही तुमचा ऑनलाईन बिझनेस सुरु करा. याचा फायदा असा होईल की तुम्हाला कस्टमरची डायरेक्ट कम्युनिकेशन करता येईल कस्टमर च्या रिक्वायरमेंट का आहेत हे तुम्हाला समजून घेता येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट तुमची सर्विस कस्टमर फ्रेंडली करता येईल. तस बघायला गेल तर भारतात अजूनही प्रत्यक्षात बोलणं झाल्यानंतरनच कस्टमर जास्त खरेदी करण्यावर विश्वास ठेवतो. ऑनलाईन खरेदीवर थोडासा तो विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही व्हाट्सअप बिजनेस च्या माध्यमातूनच सुरुवातीला ऑनलाइन बिजनेसची सुरुवात करा. व्हाट्सअप बिजनेसच्या माध्यमातून तुमचा सेल्स चांगला जनरेट झाल्यानंतर की तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर स्विच न होता तुम्ही व्हाट्सअप डीपीच्या माध्यमातून तुम्ही चांगला सेल जनरेट करू शकता आणि तिथून ही जर तुम्हाला तुमचे ऑर्डर्स मॅनेज करन पॉसिबल होत नसेल तर मग तुम्ही तुमची एक ऑनलाईन वेबसाईट तयार करू शकता. व्हाट्सअप एपीआय बद्दलचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्युब वर पाहायला भेटतील.

How to start online business fourth step : launch product : सेल्स चॅनेल क्रियेट केल्यानंतर चौथी आणि तितकीच महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपले product launch करणे. जे product तुमच्या Sales Channelच्या माध्यमातून ग्राहकांना विक्री करणार आहेत. आतापर्यंतच्या स्टेप मध्ये तुम्हाला ग्राहकांचा नेमका पेन पॉइंट समजला असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं product launch करताना या सर्व गोष्टीची मदत होणार आहे आणि तुम्ही एक चांगले प्रॉडक्ट  ठिकाणी लॉन्च करणार आहेत. online business सुरु करताना प्रोडक्ट लॉन्च करायची एक प्रोसेस आहे. सगळ्यात आधी तुम्हाला एक Hype क्रिएट करावी लागेल. Hype क्रिएट करणे म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राहकांकडे एक क्युरासिटी ज्याला आपण म्हणू शकतो की उत्सुकता तयार करायची आहे. याचा फायदा असा की कस्टमर कडे तुम्ही लॉन्च करत करत असलेल्या प्रोडक्टची उत्सुकता असल्याने तुम्ही त्यांना फ्री ऑर्डर साठी अप्रोच करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही प्रॉडक्ट लॉन्च करण्याआधीच तुम्ही preorders च्या माध्यमातून रिविन्यू जनरेट करू शकता. 

Work from home Google : ब्लॉगिंग करून महिना ५०००० ते १ लाख कसे कमवायचे ? : अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Product launch करण्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मन्स उपलब्ध आहेत ज्यालाच आपण कम्युनिटी असं म्हणतोय त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या लॉन्च बद्दल माहिती द्यायची आहे, पोस्ट करायची आहे, ॲड करायची आहेत. या ठिकाणी जे तुम्ही प्रमोशन करणार आहे ते तुमचे प्रॉडक्ट लॉन्गटर्म मार्केट करण्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

How to start online business fifth step : Retargetting तुमचे प्रॉडक्ट एकदा सक्सेसफुल लॉन्च झाल्यानंतर तुमच्याकडे आता दोन कामे उरतात. 1) रिटारगेटिंग 2) ऑपरेशन मॅनेजमेंट. भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षात घेतली किंवा खरेदी करण्याची जर पद्धत आपण जर पाहिली तर ते एखादी वस्तू किंवा एखादा प्रॉडक्ट हे एकदा पाहिलं आणि लगेच खरेदी केलं असं नाही त्यामुळे अशा ग्राहकांना आपल्याला रिटर्जीटिंगच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट आपली सर्विस पुन्हा पुन्हा दाखवावी लागते किंवा आधी एखाद्या जर प्रॉडक्ट ग्राहकांनी खरेदी केलेला आहे तर त्या ग्राहकाला आपले इतर प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला वारंवार दाखवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या री टार्गेटिंग मुळेच आपला सेल वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे रीटार्गेटिंग हे ऑनलाइन बिजनेस मध्ये खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही whatsapp ग्रुप किंवा फेसबुक अॅड instagram ॲड किंवा google आधार घेऊ शकता आणि तुमचे ग्राहक तुम्ही टार्गेट करू शकता.आता पुढचा आणि शेवटचा खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंट. आपल्याला ऑर्डर योग्य प्रकारे पॅक करून वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि ग्राहकाला जर त्या ऑर्डर संबंधित काही शंका असतील तर त्या योग्य पद्धतीने सोडवणे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही तुमचे ऑपरेशन जर योग्य प्रकारे मॅनेज केले कस्टमरला येणाऱ्या अडचणी वेळेवर सोडवल्या तर तुमचा ऑनलाईन बिजनेस दिवसेंदिवस वाढत जाईल.

How to start online business : या आर्टिकल मध्ये आपण ऑनलाइन बिजनेस सुरू करण्यासाठी काही बेसिक रिक्वायरमेंट किंवा काही पॉईंट्स म्हणू शकतो ते आपण पाहिले आहेत तुम्ही जर एखादा ऑनलाइन बिजनेस सुरू करायचा विचार करत असाल तर आर्टिकल नक्कीच तुम्हाला तुमचे मुद्दे अधिक ठळक करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल अशाच आहे. अशाच बिझनेस, बिझनेस आयडिया ब्लॉग पोस्ट साठी आपला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. तसेच फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. भेटूया पुढच्या पोस्टमध्ये.

Leave a Comment