Business तर करायचा आहे पण काय बिजनेस करायचं हेच सुचत नाहीये अशांसाठी ही आजची पोस्ट. पोस्टमध्ये मी काही एक टास्क सांगणार आहे ते टास्क करून पहा नक्कीच तुम्हाला तुमचा व्यवसाय शोधायला मदत होईल. आपल्या शहरांमध्ये वेगवेगळे छोटे-छोटे मार्केट असतात. जसं की स्टेशन चौकातलं मार्केट, एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील मार्केट, असे वेगवेगळे मार्केट आपल्या शहरांमध्ये असतात. आपल्याला मार्केटमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोण – कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत ते एका पेज आपल्याला लिहून आणायचा आहे. जसं की स्टेशन चौकात. कपड्याचे दुकान आहेत, अंड्याची दुकाने आहेत, टेलरच दुकान आहे, वडापाव चे दुकान आहे. तसंच इतर ठिकाणचे सुद्धा व्यवसाय आपल्याला लिहून आणायचे आहेत.
मालामाल बनवणाऱ्या 10 Business Idea
मालामाल बनवणाऱ्या 10 बिझनेस Idea : 10 Business Idea For Village
जसं की शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील मार्केटमध्ये कपड्याचे दुकान आहे, चिकन सेंटर आहे, किराणा दुकाने आहेत. आता सर्व ठिकाणच्या दुकानांची लिस्ट एकत्रित ठेवायची आहे. या सगळ्या लिस्टमध्ये जे व्यवसाय कॉमन आहेत त्यावर काट मारायची आहे, आणि शिल्लक व्यवसायांची पुन्हा एकदा लिस्ट तयार करायचे आहे. आता शिल्लक व्यवसायांपैकी कोणता व्यवसाय आपण करू शकतो ते तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचे आहे. आणि तो व्यवसाय ज्या एरियामध्ये नाही तो आपल्याला करायचा आहे. बघा विचार करा काही जमतय का. लक्षात आलं असेल तर नक्कीच प्रयत्न करा नसेल आलं तर भेटूया पुढच्या पोस्टमध्ये.