Lead magne strategy : बिझनेस वाढवायचा आहे तर जाणून घ्या, लीडमॅग्नेट स्ट्रॅटजि

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला बिझनेस वाढवायचा असेल तर, आपल्याला ग्राहकाची सायकॉलॉजी समजून घेतली पाहिजे.

 लीडमॅग्नेट स्ट्रॅटजि
Lead magne strategy
बिझनेस वाढवायचा आहे : Lead magne strategy 
90% ग्राहक फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्युब वर काही विकत घेण्यासाठी नाही तर ते मनोरंजन किंवा काही महत्वपूर्ण माहिती घेण्यासाठी येतात. या ठिकाणी तुम्ही जर तुमचे प्रॉडक्ट विकत बसले तर ते कोणीच घेणार नाही.
तुम्ही म्हणाल आपलं प्रॉडक्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मग कसे विकले जाणार. खरतर सोशल मीडियावर प्रॉडक्ट विकायचे नसते, तर सोशल मीडियाचा वापर आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विस साठी लीडमॅग्नेट म्हणून करायचा असतो.

Lead magne strategy म्हणजे काय ?

हे बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल. तर लीड मॅग्नेट म्हणजे अशी एखादी माहिती किंवा वस्तू की जी ग्राहकाला फ्री मध्ये किंवा नाम मात्र किमतीमध्ये आपण देतो.
उदाहरणच्या माध्यमातून आपण समजून घेऊ.
काही दिवसापूर्वी मी एका मॉलमध्ये गेलो होतो, तिथे एका गृह उद्योग समूहाचे काउंटर होते. तिथे मी एक मुरंब्याची बॉटल पाहिली आणि त्यावर किंमत पाहून मी पुन्हा ठेवून दिली‌. समोरच उभी असलेल्या सेल्स गर्ल ने ते पाहिले आणि लगेच तिच्या हातापाशी असला एक छोटा बॉक्स उचलून त्यामध्ये त्यांच्या टॉप सेलिंग चटण्यांपैकी पाच सॅम्पल आहेत आणि ते त्या मुरांब्याच्या बॉटल सोबत फ्री आहेत असे सांगितले.
त्यावेळी मी फ्री हा शब्द ऐकून ती मुरांबाची बॉटल खरेदी केली आणि सोबत मी ते फ्री सॅम्पल सुद्धा घेतले. पुढच्या खरेदीच्या वेळी मी त्या सॅम्पल चटण्यांपैकी काही चटण्या खरेदी केल्या. थोडक्यात सेल्स गर्लने या ठिकाणी लिडमॅग्नेट सेल्स स्ट्रॅटजी वापरली.

आता सोशल मीडियावर लीड मॅग्नेट कसं काम करतं ते पाहू :Lead magne strategy

सोशल मीडियावर आपण बऱ्याच वेबिनारच्या जाहिराती पाहतो, हे वेबीनार घेणारे लीड मागणे कसे क्रिएट करतात ते पाहू.
काही दिवसापूर्वीच मी एक ऑनलाईन वेबिनार अटेंड केला. वेबीनार होता जॉब टू बिझनेस मास्टर क्लास याची किंमत होती फक्त 49 रुपये. 49 रुपये बघून माझ्यातला विद्यार्थी जागा झाला आणि मी लगेचच त्या वेबवरला रजिस्टर केले. म्हटलं चला नवीन काहीतरी शिकायला भेटेल.
तो वेबिनार मी पूर्ण अटेंड केला, त्या वेबिनार च्या पहिल्या सेशनमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.त्या सरांनी आपण ऑनलाइन बिजनेस कसा सुरू करू शकतो याबद्दल, एक छानशी ब्लू प्रिंट दिली.आणि त्या तिथेच त्या 49 रुपयाचं काम संपलं.
त्या वेबिनारच्या आता दुसऱ्या सेशनची वेळ.
दुसऱ्या सेशनमध्ये त्यांनी हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर स्वतःहून हा सगळा बिजनेस सेटअप जर करत बसाल तर खूप वेळ लागेल आणि पैसा जाईल.
मग यावर उपाय काय?
तर यावर उपाय माझे कन्सल्टेशन घ्या. ज्याची फी फक्त पाचशे रुपये आहे. यापुढे तेहेही म्हणाले की तुम्ही जर आत्ता पाचशे रुपये खर्च करून करू शकले नाही तर तुमचं बिजनेस करायचं स्वप्न हे स्वप्नच राहील.
आता मग काय! माझ्यासकट त्या वेबिनारला जॉईन झालेले 90% लोक इमोशनली दुखावले गेले आणि त्यांनी फटाफट 500 रुपये भरून सरांच्या कन्सल्टेशन साठी रजिस्ट्रेशन केले.आता तुम्ही इथे म्हणाल की त्यांनी 49 रुपयाच्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पाचशे रुपयाच्या कन्सल्टेशन साठी रजिस्ट्रेशन करून घेतले, म्हणजे त्यांना 49 रुपयाच्या लीड मॅग्नेटवर 451 रुपयाचा फायदा झाला.तुम्हाला जर वाटत असेल की लीड आता इथेच क्लोज झाले. तर तुम्ही साफ चुकीचे ठराल. कारण सरांचे अजून वन टू वन कन्सल्टेशन बाकी आहे.
आता पण सरांच्या वन टू वन सेशनमध्ये सरांनी काय मार्गदर्शन केलं ते पाहू.
सरांनी दिलेल्या वेळेला आमचे वन टू वन बोलणे झाले.सरांना मी माझ्याबद्दल सर्व काही माहिती सांगितली. सर मला मी माझा ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करू शकतो याबद्दल मार्गदर्शन करणार होते.
माझं सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर सरांनी माझे भरभरून कौतुक केले आणि म्हणाले, अरे तुला तर ऑनलाईन बिजनेस बद्दल खूप सगळी माहिती आहे, फक्त तुला तुझं नॉलेज एका फ्रेमवर्कमध्ये करावं लागेल आणि तसे तू जर केलेस तर तू पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुझा सक्सेसफुल ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकतोस.
हे ऐकून मी खूपच खुश झालो आणि सर पुढची स्टेप काय मला सांगा मी तयार आहे ! हे माझ्या तोंडून सहज निघाले.
सरांनी पुढच्या स्टेप सांगायला सुरुवात केली.मी तुझा ऑनलाइन बिजनेस पुढच्या दोन महिन्यात सेटअप करून देतो पण, पण हा शब्द ऐकताच माझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कमी झाला, आणि पण या शब्दा नंतरचे वाक्य ऐकण्यासाठी मी माझे कान टवकारले. पण या शब्दा नंतरच वाक्य असं होतं की यासाठी तुला रुपये 40 हजार रुपये इन्वेस्टमेंट करावी लागेल. रुपये चाळीस हजार ही त्या सरांची लीड क्लोजरची अमाऊंट होती.
थोडक्यात काय तर सरांनी लीडमॅग्नेटचा खूप चांगल्या प्रकारे वापरले.
पोस्ट खूप मोठी झाली आहे, या पोस्टमध्ये इथेच थांबतो.
लीडमॅग्नेट काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. बिझनेस ग्रोथ साठी लीग मॅग्नेट तयार करा पण ते योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवा, नाहीतर त्यावर केलेली वेळेची, पैशाची मेहनत वाया जाईल.
भेटूया पुढच्या पोस्टमध्ये…🙏

Join WhatsApp Group 

Join Telegram Channel

घरातुनच सुरु करा अगरबत्ती व्यवसाय : सविस्तर माहितीसती येथे क्लिक करा.

तुमच्याकडे जर स्मार्टफोन आहे तर आता Google वर काम करून कमवा महिना 50000 : सविस्तर माहितीसती येथे क्लिक करा.

यशस्वी व्यक्तींच्या दररोजच्या ०९ सवयी, ज्या त्यांना जीवनात यशस्वी बनवतात : सविस्तर माहितीसती येथे क्लिक करा.

काय बिझनेस करू ? भाग 02: बिझनेस तर करायचा आहे पण काय बिजनेस करायचं हेच सुचत नाहीये.

Leave a Comment