तुम्ही जर low investment business ideas शोधत असाल आणि 10 ते 15 हजाराच्या गुंतवणुकीत सुरु होणार तसेच घरातून करता येणार व्यवसाय पाहिजेल, तर ही business idea तुमचाच साठी आहे. Best low investment business ideas ती म्हणजे Flash Stamp बनवण्याचा व्यवसाय.कायम मागणी असलेला, अजिबात स्पर्धा नसलेला आणि विशेष म्हणजे अगदी घरातून10 ते 15 हजाराच्या गुंतवणुकीत सुरु करता येणार हा व्यवसाय आहे.
How to Start Flash Stamp Business : low investment business ideas
जग कितीही digital झाले असले तरीही कागदपत्रांवर स्टॅम्पला म्हणजेच शिक्क्याला एक विशेष महत्व आहे. स्टॅम्प म्हणजे काय ? हे मी तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही, पण Flash Stamp म्हणजे काय? आणि १० ते १५ हजार रुपये गुंतवणुकीत हा low investment business आपण घरातूनच कसा सुरु करू शकतो? ते आपण पुढे पोस्ट मध्ये पाहू.
Flash Stamp म्हणजे काय?
Flash Stamp म्हणजे इंक पॅड शिवाय चालणार एक आधुनिक स्टॅम्प, जे दिसायला तर पोफेशनल आहेतच पण वापरायलाही अगदी सोपे आहेत. या स्टॅम्पमध्ये स्टम्पच्या आतमधेच इंक भरलेली असते. आजकाल असे Flash Stamp वकील, डॉक्टर, ऑफिस, शाळा, कंपन्या, बँकांमध्ये सगळीकडे पाहायला मिळतात.

Flash Stamp व्यवसायाच का निवडावा ?
सुरवातीला 10 ते 15 हजाराच्या गुंतवणुकीत आणि अगदी घरातून हि हा Flash Stamp व्यवसाय सुरु करता येतो.
- कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो.
- घरबसल्या छोट्याश्या जागेत हा व्यवसाय सुरु होतो.
- मशीन आणि साहित्य सहज उपलब्ध होतात.
- सतत मागणी असलेला हा व्यवसाय आहे.
- दररोज रोख नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे .
- महिला, विद्यार्थी आणि तरुणयांसाठी योग्य आसा स्टार्ट-अप.
Flash stamp व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी Machine आणि raw material
10 ते 15 हजाराच्या गुंतवणुकीत खालील Machine आणि raw material खरेदी करणे आवश्यक आहे.
- Flash Stamp Machine – ₹7,000 ते ₹10,000
- Flash Foam Sheet
- Stamp Handle
- इंक (ब्लॅक, ब्लू, रेड, ग्रीन)
- डिझाईन सॉफ्टवेअर – CorelDRAW (फ्री ट्रायल वापरता येतो)
- कटर, स्केल, डबल साईड टेप
- प्रिंटर (ऑप्शनल – डिझाईन प्रिंटसाठी)
स्थानिक मार्केट मध्ये किंवा Amazon, IndiaMART वर हे सर्व सहज मिळून जाईल. वर दिलेल्या सर्व Amazon link आहेत.

Flash Stamp तयार कसा तयार करायचा ? स्टेप बाय स्टेप process.
Flash Stamp तयार करण्याची process अगदी सोपी आणि 10-15 मिनिटात होणारी आहे.
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. :
स्टेप 1- ग्राहकांकडून आवश्यक ती माहिती घ्या :
ग्राहकांकडून त्यांना कोणत्या प्रकारचा stamp तयार करून हवा आहे ते स्पष्ट समजून घ्या, कारण चुकीचा stamp तयार झाल्यास आपलेच नुकसान होईल. त्यामुळे stamp बनवण्यासाठी आवश्यक माहिती जसेकी नाव,पद (Manager, Advocate, Doctor इ.), ऑफिस/कंपनीचे नाव, पत्ता किंवा GST नंबर (जर हवे असेल तर), कोणत्या भाषेत हवा आहे? (मराठी / इंग्रजी) इत्यादी माहिती व्यवस्तीत नोंद करून घ्या.
स्टेप 2- डिझाईन तयार करा (software वापरून) :
ग्राहकाकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे CorelDRAW, Photoshop किंवा इतर software वापरून शिकायचे design तयार करून घ्या. design तयार करताना Stamp ची साईझ विचारात घेऊन disign तयार करा.
स्टेप 3 – Flash Foam शीटवर डिझाईन एक्सपोज करा :
Flash Stamp मशीनमध्ये Foam शीट ठेऊन त्यावर तयार केलेली डिझाईन प्रिंट ठेवा. Flash Stamp मशीन सुरु करून मशीन उत्पादकाच्या गाईड लाईन नुसार डिझाईन Foam वर एक्सपोज करा.
हि स्टेप अतिशय काळजी पूर्वक आणि अचूक करणे अतिशय महत्वाचे आहे.
स्टेप 4 – Stamp टेस्ट करा. :
तयार झालेल्या Flash Stamp मध्ये ग्राहकाच्या गरजेनुसार ब्लॅक, ब्लू, रेड इंक योग्य प्रमाणात भरून ५ ते १० मिनिटांनी एका प्लेन कागदावर स्टॅम्प ची प्रिंट योग्य ते चेक करा. Stamp वरील सर्व मजकूर प्रिंट होत असल्याचची खात्री करा. तयार झालेला stamp चांगल्या Packaging मध्ये आणि तुमच्या ब्रॅण्डिंग सह ग्राहकाला देण्यासाठी तयार ठेवा.
खर्च आणि नफा तपशील
तपशील | अंदाजे खर्च |
---|---|
एका स्टॅम्पचा कच्चा खर्च | ₹10 ते ₹25 |
विक्री किंमत | ₹100 ते ₹200 |
प्रति स्टॅम्प नफा | ₹70 ते ₹150 |
सरासरी दिवसला १०, Flash Stamp जरी तुम्ही बनवले, तरी तुमचे दररोजचे उत्पन्न ₹700 ते ₹1500 होऊ शकते.
marketing कसे कराल ?
marketing हा कोणत्या हि व्यवसायाचा खूप महत्वाचा भाग असतो, Flash Stamp चे मार्केटिंग तुम्ही खालील पद्धतीने करू शकता.
-
WhatsApp कॅटलॉग तयार करा.
-
Instagram आणि Facebook पेज तयार करा.
-
Google Business Profile वर लिस्टिंग करा.
-
लोकल दुकानदार, वकील, डॉक्टर यांच्याशी थेट संपर्क करा.
-
रेफरल ऑफर देऊन ग्राहक वाढवा
परवाने व कायदेशीर बाबी
Flash Stamp व्यवसाय सुरु करताना खालील काही परवाने आणि महत्वाचा नोंदणी करून घेणे फायद्याचे ठरते.
✅ 1. UDYAM/MSME नोंदणी (लघुउद्योग नोंदणी)
कशासाठी आवश्यक?
⏺️ तुमचा व्यवसाय अधिकृतपणे सरकारकडे नोंदवण्यासाठी
⏺️ लोन, सबसिडी, सरकारी योजना मिळवण्यासाठी
फायदे:
-
उद्योग आधार प्रमाणपत्र मिळते
-
MSME लाभासाठी पात्र ठरता
-
बँक लोन मिळण्यास मदत होते
-
टेंडरमध्ये सहभाग घेता येतो
नोंदणी कुठे करावी?
👉 https://udyamregistration.gov.in वर फ्री रजिस्ट्रेशन करता येते.
✅ 2. शॉप अॅक्ट लायसन्स (Gumasta License)
कधी आवश्यक?
⏺️ तुम्ही दुकान किंवा किरकोळ व्यवसाय चालवत असाल
⏺️ ऑफिस / वर्कशॉप सार्वजनिक ठिकाणी असेल
फायदे:
-
व्यावसायिक पद्धतीने काम करता येते
-
सरकारी नियमांचे पालन होते
-
बँकेत चालू खातं उघडण्यासाठी उपयुक्त
नोंदणी कुठे करावी?
👉 स्थानिक महानगरपालिका / ग्रामपंचायत कार्यालयात
✅ 3. GST नोंदणी (जर आवश्यक असेल तर)
कधी आवश्यक?
⏺️ तुमचा वार्षिक टर्नओव्हर ₹20 लाखांहून अधिक असेल
⏺️ तुम्ही इतर राज्यांमध्ये वस्तू/सेवा विकत असाल
फायदे:
-
ग्राहकांना अधिकृत इन्व्हॉईस देता येतो
-
मोठ्या कंपन्यांशी व्यवहार करता येतो
-
ऑनलाईन सेल्ससाठी उपयुक्त
नोंदणी कुठे करावी?
👉 https://www.gst.gov.in
✅ 4. करसल्लागार / CA ची मदत घ्या (ऐच्छिक)
⏺️ जर तुम्हाला कर, परवाने, बँकिंग किंवा दस्तऐवजीकरण संदर्भात गोंधळ वाटत असेल, तर एक अनुभवी CA किंवा सल्लागार यांची मदत घ्या.
⏺️ व्यवसायाची वाढ होत असताना हे तुम्हाला लॉन्ग टर्ममध्ये फायदेशीर ठरते.
या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती ही फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने देण्यात आलेली आहे. येथे दिलेल्या माहितीच्या आधारे कोणताही व्यवसाय सुरू करताना स्थानिक कायदे, परवाने, आर्थिक गुंतवणूक याची खातरजमा स्वतः करणे गरजेचे आहे.
लेखक किंवा प्रकाशक कोणत्याही आर्थिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक नुकसानीस जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घेणे.

डाउनलोड ईबुक
हे नक्की वाच :
Business Idea : घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंगचा व्यवसाय एक उत्तम पर्याय
Business Idea : श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय व्यवसाय कसा सुरू करायचा?
अशाच बिझनेस आर्टिकल्ससाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Join WhatsApp Group
New Business Ideas Shredded Paper चा व्यवसाय कसा सुरू करायचा?