Make money from google news : गुगलवर काम करून रोज ₹2000-3000 कमवा

Make money from google news : Google चा वापर आपण बऱ्याचदा आपल्याकडे येणारे प्रश्न आणि त्यांची अपेक्षित उत्तरे शोधण्यासाठी करतो. म्हणजेच काय तर गुगलचा उपयोग आपण वेगवेगळ्या विषयावरील माहिती, बातम्या, मिळवण्यासाठी करतो. याच गुगलच्या माध्यमातून आपण दररोज घरबसल्या दोन ते तीन तास काम करून महिना कमीत कमी 40 ते 60 हजार रुपये कमवू शकतो. आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण गुगल वरून पैसे कमवण्याचा genuine आसा मार्ग पाहणार आहोत जो की तुम्ही पूर्णपणे पार्ट टाईम करू शकता, तुम्ही स्टुडंट असाल तरी करू शकता, तुम्ही हाउसवाइफ आहात तरी करू शकता किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात तरी ही तुम्ही हे काम पार्ट टाइम मध्ये दिवसाचे फक्त दोन ते तीन तास वेळ देऊन करू शकता आणि महिना 40 ते 60 हजार रुपये नक्कीच कमवू शकता. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की तुम्ही सांगितलेले हे काम जर मी सुरू केले तर लगेच मला 40 ते 60 हजार रुपये महिना यायला सुरू होतील का ? तर नाही. पोस्टच्या सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर करतो की, तुम्ही काम चालू  केल्यास लगेच तुम्हाला 40 ते 60 हजार रुपये सुरू होणार नाही. पण तुम्ही तुमच्या कामात जर सातत्य ठेवल तुम्ही तुमच काम अचूक केल दररोजचे दोन ते तीन तास तुम्ही रेगुलरली या कामासाठी दिले तर पुढच्या येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्ही नक्कीच महिना 40 ते 60 हजार रुपये कमवायला सुरुवात कराल, आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्ही तो 40 ते 60 हजार रुपयेचा आकडा क्रॉस करून महिना एक लाख रुपये सुद्धा कमवू शकता. तर हे आर्टिकल make money from google news खूप काळजीपूर्वक वाचा. या आर्टिकलमध्ये जी माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारे तुमच्या कामाची स्ट्रॅटर्जी ठरवा आणि कामाला सुरुवात करा.

Make money from google news

Join Whatsaap Group

या आधीही आपण गुगल वरून घरबसल्या पैसे कसे कमवता येतील याबद्दलच्या बऱ्याच पोस्ट केल्या आहेत. आजच्या make money from google news या पोस्टमध्ये आपण Google Newsच्या मदतीने आपण महिना 40 ते 60 हजार रुपये कसे कमवू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या प्रत्येक कडेच आता अँड्रॉइड मोबाईल फोन आहे. आणि या अँड्रॉइड मोबाईल मुळे आता न्यूज वाचणारे ही फिजिकल वर्तमानपत्र वाचण्या ऐवजी डिजिटल वर्तमानपत्र किंवा डिजिटल न्यूज आर्टिकल वाचण्यासाठी प्राध्यान देताना दिसत आहेत. जे लोक न्यूज वाचण्याचे शौकीन आहेत ते न्यूज वाचण्यासाठी साहजिकच त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये असलेल्या गुगल क्रोमचा किंवा न्यूज एप्लीकेशनचा उपयोग करतात. साहजिकच डिजिटल न्यूज आर्टिकल वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Google news काय आहे ?

Google news हे एक गुगलचे प्रॉडक्ट आहे की जे वेगवेगळ्या न्यूज ब्लॉग किंवा वेबसाईट वरील माहिती ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळून देण्यासाठी बनवले आहे. Google news वर पब्लिश होणारे न्यूज आर्टिकलस् हे व्हेरिफाइड असतात, हाय कॉलिटी कॉन्टेन्ट असतो, ब्रेकिंग न्यूज असतात, पर्सनलाईज न्यू स्टोरीज असतात, लोकल न्यूज असतात, अशा वेगवेगळ्या कॅटेगरी मधल्या न्यूज Google news च्या माध्यमातून आपल्याला एकाच ठिकाणी वाचायला मिळतात. Google news ह App तुम्हाला अँड्रॉइड आणि आयएसओ मोबाईल साठी उपलब्ध आहे. आता एकंदरीत Google news काय आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. Google news हा एक न्यूज आर्टिकल चा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळ्या टॉपिक वरचे न्यूज किंवा माहिती वाचतात आणि त्यांच्या ज्ञानात भर करतात.

वरती आपण Google news काय आहे ते आपण जाणून घेतले. आता गुगल न्यूज च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे यासाठी थोडस अजून सविस्तर Google news बद्दल माहिती घेऊया. Google Search app किंवा Google Chrome app ओपन केल्यानंतर टॉपलाच Discover म्हणजेच होमपेजवर आपल्याला बरेच न्यूज आर्टिकल्स दिसतात. हे आर्टिकल्स वेगवेगळ्या ब्लॉग वेबसाईट वरील आर्टिकल्स असतात.वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला ते आर्टिकल सविस्तर वाचायला मिळते.

Make money from google news

गुगलवर काम करून महिना ₹40000-60000 कसे कमवायचे ते आता पुढे पाहू. google News वर वाचायला भेटणारे आर्टिकल्स हे कुणीतरी एका राईटरने(लेखक) लिहिलेले असणार आहे, ज्यालाच डिजिटल भाषेमध्ये ब्लॉग राईटर म्हणतात. ती न्यूज, ती ब्लॉग पोस्ट गुगलवर पब्लिश केल्यानंतर गुगल त्या ब्लॉग पोस्टमध्ये ऍडव्हर्टाईसमेंट रन करतात आणि त्याच ॲडवटाईजमेंटच्या रेवेन्यू मधून काही पर्सेंटेज गुगल त्या राईटरला पे करते आणि तीच त्या ब्लॉग राईटर ची कमाई. आता तुम्हाला थोडीशी हिंट आली असेलच की Google News वर पैसे कसे कमवायचे ते. काहींनी गेस केले असेलच, गुगल न्यूजवर तुम्हाला ब्लॉग राईटर म्हणून काम करायचे आहे आणि जेवढे जास्त तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहाल तेवढ्या जास्त ऍड्स तुमच्या त्या ब्लॉग पोस्टवर येतील आणि तुमची अर्निंग त्या पद्धतीने वाढत जाईल.
How to write a blog for Google News?

गुगल न्यूजसाठी ब्लॉग पोस्ट कुठे व कशी लिहायची याबद्दल थोडक्यात माहिती आपण पुढे पोस्टमध्ये घेऊया. गुगल न्यूजसाठी तुम्हाला तुमची एक ब्लॉक वेबसाईट तयार करावी लागेल. त्या वेबसाईटवर तुम्हाला आर्टिकल लिहून ती वेबसाईट तुम्हाला गुगल न्यूजला लिंक करावे लागेल. तुम्ही ती वेबसाईट गुगल न्यूजला लिंक केल्यानंतर तुमच्या त्या वेबसाईटवर ट्राफिक यायला सुरुवात होईल. तुमच्या वेबसाईटवर जेवढे जास्त ट्राफिक येईल तेवढा जास्त गुगल ॲड्स तुमच्या वेबसाईटवर करेल आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा रेवेन्यू जनरेट होईल. याबद्दलचा सविस्तर ब्लॉग आपल्या वेबसाईट वरती आहे. त्याची लिंक खाली देत आहे.

ब्लॉगिंगच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे सविस्तर आर्टिकल वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी wordpress, hostinger, SEO, keywords, domain name, content niche या आणि अशा बऱ्याच टूल्स बद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. या टूल्स बद्दलची सविस्तर माहिती तुम्ही युट्युब वरुन घेऊ शकता. तसेच याबद्दलचे बरेच ब्लॉग आर्टिकल ही तुम्हाला इंटरनेटवर पाहायला भेटतील. ब्लॉगिंग बद्दलचे बरेच मराठी,हिंदी ऑफलाइन किंवा ऑनलाईन कोर्सेस आहेत. काही कोर्सेस महाग आहेत तर काही कोर्सेस परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या कुवतीनुसार एखाद्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्समध्ये एनरोल करून तुम्ही तुमची ब्लॉगिंग जर्नी सुरू करू शकता.

Make money from google news

या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रोटीप देऊ इच्छितो, ब्लॉगिंग करायच हे जर तुम्ही निश्चित केले असेल तर मेंटॉरशिपसाठी म्हणजेच तुम्ही करत असलेले काम किती बरोबर किती चूक हे समजून घेण्यासाठी एखादा ऑफलाइन किंवा ऑनलाईन कोर्स नक्की करा. पण त्याआधी युट्युब वरचे ब्लॉगिंग संदर्भातील व्हिडिओ पाहून एक महिना आधी तुम्ही ब्लॉकिंग ची प्रॅक्टिस सुरू करा. प्रॅक्टिस सुरू करायची म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला ज्या विषयांमध्ये ब्लॉग लिहायचे आहेत तो विषय आधी निश्चित करा त्या संदर्भातील इतर ब्लॉग तुम्ही वाचा. ते समजून घ्या ते कसे लिहिले आहेत ते पहा हिंदी इंग्लिश या भाषेतील ब्लॉग सुद्धा वाचा आणि मग तुम्ही तुमचे ब्लॉग लिहायला सुरुवात करा. ब्लॉग लिहिताना एक महिन्याचे ब्लॉक टॉपिक पहिल्या दिवशी लिहून काढा आणि दररोज या टॉपिक वर कमीत कमी 600 शब्दांचा आपण ब्लॉग लिहू शकतो याची प्रॅक्टिस करा. या एक महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर तुम्हाला अंदाज येईलच की आपण या ब्लॉग रायटिंग करियरमध्ये काम करू शकतो किंवा नाही. यानंतरच तुम्ही एखादा कमी किमतीचा पेड कोर्स करून. तुमच्या चुका सुधारून तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग करियरला सुरुवात करा.

तुम्ही जर ब्लॉगिंग मध्ये नवीन आहेत किंवा तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल बेसिक नॉलेज आहे. तरीसुद्धा तुम्ही ब्लॉगिंग मध्ये करियर सुरू करताना किंवा पार्ट टाइम काम सुरू करताना ब्लॉगिंगचा कोर्स करूनच सुरू करा. कारण जोपर्यंत तुम्हाला एखादा मेंटॉर भेटत नाही तुम्ही कुठे चुकत आहे, तुम्हाला कुठे सुधारणा करायला हवी आहे याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन जर भेटले नाही तर, तुम्ही तुमच्या कामात स्किल करू शकणार नाही. ऑफलाईन किंवा ऑनलाईन जो कोणताही तुम्हाला कोर्स परवडणारा वाटेल तो तुम्ही करून तुमच्या या ब्लॉगिंग करिअरला सुरुवात करा. पार्ट टाइम किंवा फुल टाइम तुमच्या या ब्लॉगिंग करिअरला सुरुवात करण्यासाठी साधारण तुम्हाला कमीत कमी चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो.

ब्लॉगिंग बद्दल डिटेल माहिती साठी Blogging Insider या युट्युब चॅनेल वरचे व्हिडीओ पाहू शकता. तसेच मराठी ब्लॉगिंग कोर्स बद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास help.yashaswiudyog@gmail.com या email ID ई-मेल करा.

Leave a Comment