Plastic Bottle Manufacturing – Business Ideas in Marathi
प्लास्टिक बॉटल निर्मिती उद्योग
प्लास्टिकचा शोध लागल्यापासून दैनंदीन जीवनातील वापरात येणारी प्रत्येक वस्तु आज प्लास्टिकपासून तयार केली जात आहे. प्लास्टिकचा उपयोग औद्योगिक व इतर क्षेत्रात वाढला असलेने प्लास्टिक उत्पादनांना आज प्रचंड मागणी आहे.
Business Ideas in Marathi : खुर्च्या, टेबले, फर्निचर पासून स्वयंपाक घरातील बरण्यांपर्यंत प्रत्येक वस्तु प्लास्टिकपासून बनत आहे. दिसायला आकर्षक वापरायला सहज सुलभ, वजनाला हलक्या किंमतीत स्वस्त असल्याने ग्राहकालाही पसंत पडतात. प्लास्टिक उत्पादनां पैकीच एक उत्पादन आहे प्लास्टिक बॉटल्स. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे स्ट्रेच व्लो मोल्डेड पध्दतीने बाटल्या तयार केल्या जातात.
पॉलीव्हिवाईल क्लोराईड व पॉलिएथिलीन टेरीथेलेट या पदार्थांचा वापर स्ट्रेच ब्लो / मोल्डेड पध्दतीमध्ये केला जातो. भारत हा विकसनशील देश आहे, विकसीत देशांत या बाटल्यांना सार्वत्रीक मागणी असल्याने भारतात ही स्ट्रेच ब्लो मोल्डेड प्लास्टिक बाटल्यांना प्रचंड मागणी आहे. अधिक पारदर्शक, विघटन प्रतिरोधक, क्षार व गॅस प्रतिबंधक व मजबुत स्वरूपाच्या असल्याने पीईटी बाटल्यांना शितपेये व ब्रेवरेज पॅकेजींग करीता सर्वात जास्त मागणी आहे. पीईटी, पीपी व पिव्हीसी बाटल्यांना लागणारा कच्चा माल आपल्या देशातच मिळतो. पॉलीमर या कच्च्या मालापासून या बाटल्या तयार होतात. हे प्लास्टिक वापरून फेकून दिल्यानंतरही त्याचे रुपांतरीत स्वरूप तयार करता येते. रिसायकलींग होत असलेने कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत नाही. प्लास्टिक पासुन तयार केल्या जाणाऱ्या सर्वच वस्तु या प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये तज्ञांच्या सल्ल्याने अनुभवाने व तज्ञ विशेषज्ञांनी बनवलेल्या फॉमुर्ल्याच्या आधारे बनवल्या जातात.
Plastic Bottle Manufacturing – Business Ideas in Marathi
रासायनिक प्रक्रिया होणारा उद्योग असल्याने प्रकल्प उभा करण्यापुर्वी त्याची जागा निवासी वस्त्यांपासून लांब असावी. तज्ञ विशेषज्ञांकडून फॉर्मुला बनवुन घेवून कुशल मनुष्य बळांकडून उत्पादन तयार करून घ्यावे. रासायनिक उद्योगांकरिता शासनाचे कायदे नियम अत्यंत कडक असुन सर्व नियमांचे पालन करून कायदेशीर परवाने घेवून तज्ञांच्या देखरेखीखाली उत्पादनाची सुरूवात करावी. प्लास्टिकचा वापर सौंदर्य प्रसाधनांची पॅकींग करण्यासाठी, खाद्यतेलाच्या पॅकींग करीता, रंग, शितपेये यांच्या पॅकींगकरीता सर्वाधीक होतो.
पुर्वि लोखंडी कंटेनर्स मालाची वाहतुक करणे करीता असायची, त्यांची जागाही आज प्लास्टिकच्या कंटेनर्सनी घेतली आहे. मानवाच्या दैनंदीन जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्लास्टिकचा वापर बेसुमार आहे.शितपेये, बियर, खाद्य तेले यांची पॅकींग तर सर्रास प्लास्टिकच्या बॉटल्स मधुनच होतात. ब्रेवरीज मध्ये कोल्ड्रींक्स पासुन बिसलरी अॅक्वा पाण्याच्या पॅकींग करीताही प्लास्टिकच्या बाटल्याच वापरल्या जातात. आपण पाणी पिऊन, कोल्ड्रींक्स पिल्यानंतर इस्तत: विखुरलेल्या बाटल्या नेहमीच पाहतो. भंगारवाले या बाटल्या जमा करून कबाडाला विकतात. त्याच बाटल्या रिसायकलींग होवून पुन्हा नविन होवून विक्रीस येतात. खाद्यतेलाच्या सर्रास पॅकींग करीता प्लास्टिक बॉटल्सच वापरतात. वनस्पती तुप, स्क्वॅश, जाम, सरबातादी पेये, वाहनांची महागडी ऑईल्स ही आज प्लास्टिक बॉटल्स मधुनच विक्रीस येतात.
प्लास्टिक बॉटल तयार करण्याचा प्रकल्प हा तसा आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या मोठा प्रकल्प असून येथे त्याची संक्षिप्त माहीती आहे. तज्ञांच्या सल्ल्याने, विशेषज्ञांच्या देखरेखीखाली प्रकल्प सुरू करावा. आर्थिक पाठबळा बरोबरच, बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून नफा तोट्याचा पुर्ण अंदाज घेवून प्रकल्प सुरू करावा.
New Business Ideas Shredded Paper चा व्यवसाय कसा सुरू करायचा?