Startup idea bhag 02 : बिझनेस तर करायचा आहे पण काय बिजनेस करायचं हेच सुचत नाहीये.

Startup idea bhag 02 : ज्यावेळी एखादी व्यवसाय कल्पना अमलात आणायचा विचार करता, त्यावेळी तुम्हाला त्या व्यवसायाच्या बाबतीतील माहिती गोळा करणे आणि त्याच्यावर विश्लेषण पूर्वक अभ्यास करून मगच आपल्याला व्यवसाय सुरु करावा लागतो.
आपण सुरू करणारा व्यवसाय कोणत्या एरियामध्ये आहे, त्या एरियामध्ये आपल्या व्यवसायाला किती स्कोप असू शकेल, आपले संभाव्य ग्राहक नेमके कोण आहेत ते त्या एरियामध्ये किती परसेंटेज असतील, आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रॉफिट मिळवून द्यायला किती वेळ लागेल. आपलं बजेट किती आहे. आपल्या बजेटनुसार आपल्याला प्रॉफिट मिळेपर्यंत आपण या बिजनेस मध्ये टिकून राहू का. या आणि अशा अनेक प्रश्नांची आपल्याला शहानिशा करावी लागते आणि मगच व्यवसाय सुरू करावा लागतो.