व्यवसाय करायचा म्हणलं की त्यासाठी लाखो रुपयांचं भांडवल आवश्यक आहे अशी चर्चा सध्या स्टार्टअप सुरू करू इच्छणाऱ्या नवीन तरुणाई मध्ये पाहायला भेटते. आमच्याकडे आयडिया आहे पण फंडिंग नाही आणि त्यामुळे आम्ही आमचा स्टार्टअप सुरू करू शकत नाही अशी निगेटिव्ह थिंकिंग या तरुणाई मध्ये पहिला भेटते. तुमच्याकडे जर चांगली एखादी युनिक स्टार्टअप आयडिया असेल तर तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या थोड्या थोड्या भांडवलातून सुद्धा एक चांगला यशस्वी उद्योग सुरू करू शकता हे सिद्ध केले आहे, चेन्नईच्या थुथकुडी गावच्या सूर्या वर्षने.
Success Story : Cosmetics Brand Naked Nature दहा कोटी रुपये टर्नओव्हर असलेल्या स्किन अँड पर्सनल केअर ब्रँडचा मालक आहे, तमिलनाडु मधील 21 वर्षीय सूर्या वर्षन
Success Story Cosmetics Brand Naked Nature : सूर्या वर्षन हा तमिलनाडु मधील एक 21 वर्षीय अंडरग्रॅज्युएट मुलगा असून, त्याने कॉस्मेटिक आणि स्किन केअर इंडस्ट्रीमध्ये सुरू केलेल्या व्यवसायाची सध्याची उलाढाल 56 लाख रुपये आहे. कंपनीचे मूल्यांकन म्हणाल तर दहा कोटी रुपये इतके आहे. सूर्या वर्षानचा Naked Nature या नावाने brand प्रसिद्ध आहे. अवघ्या दोनशे रुपयांच्या भांडवलासह घरातून सूर्या वर्षानने या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्याच्या या स्टार्टअप ची स्टोरी आपण आजच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.
Success Story : सूर्या बारावीला असतानाच त्याला त्याच्या पालकाकडून मिळत असलेल्या पॉकेट मनी मधून त्याने आपल्या घरातच एक बाथ सॉल्ट बनवला. सूर्या त्याच्या एका मुलाखतीत सांगतो मुंबईतील एका ठिकाणाहून विकत घेतलेले डेड सी मीठ वापरून आणि त्यात काही फुलांचा अर्क घालून त्याने त्याचे पहिले प्रोडक्ट तयार केले होते. ते स्किन साठी खूप चांगला आहे. अवघा बारावीत असणारा मुलगा काहीतरी व्यवसाय करतो आहे हे पाहून बऱ्याच जणांनी त्याला इग्नोर केले. पण सूर्याने त्याची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही, चेन्नईला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतल्यानंतर शनिवार रविवारच्या सुट्टीत तो आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंग आणि सेल साठी मदुराईला जात असे. पण त्याला म्हणावं तसं यश भेटत नव्हता. एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सॅम्पल प्रॉडक्ट वापरून आणखीन प्रॉडक्टची मागणी केली तेव्हा त्याच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मदुराईला त्याच्या व्यवसायाला मार्केट मिळत असल्याने त्याने मदुराईला कॉलेज करायचे ठरवले. आणि तो मदुराईला शिफ्ट झाला.व्यवसाय वाढीसाठी आवश्यक फंड उभारण्यासाठी त्याने युट्युब वरून डिजिटल मार्केटिंग शिकून त्याचे क्लास घेतले. यातून त्याला जवळपास दोन लाख वीस हजार इतके जमा झाले. ते त्याने त्याच्या स्टार्टअप Naked Nature ब्रँड साठी गुंतवले. सूर्यन सांगतो तो मदुराई मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचा मदुराईत फोटो स्टुडिओ आहे. सुर्यनला एक लहान भाऊ असून त्याची आई गृहिणी आहे. सूर्यन सांगतो सातवी-आठवीत असतानाच मी माझ्या पोकेटमनी मधून एक रुपयचे चोकलेटस खरेदी करायचो आणि ते सणासुदीच्या काळात जेव्हा रस्त्यावर गर्दी असते तेव्हा घराबाहेर दोन रुपयांना विकायचो.
Naked Nature या सूर्यनच्या Brand चे सध्या मार्केटमध्ये जवळपास 47 उत्पादने आहेत, ज्यामध्ये रु. 150 च्या Hibiscus Bath Soap पासून रु. 400 च्या Manjista Face Toner सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. सूर्यनचचे Manufacturing Unit हे 800 चौरस फुटाचे असून त्याच्यासोबत सध्या 6 कामगार काम करतात. त्यांची उत्पादने तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रा अशा विविध राज्यातील नऊ स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. सूर्यन सांगतो त्याच्या पालकांनी दिलेल्या पाठीम्ब्यामुळेच तो हे यश मिळवून शकला आहे.
अशाच सक्सेस स्टोरी बिझनेस आयडियाच्या आर्टिकल्स साठी खाली दिलेले टेलिग्राम चॅनेल आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.