Sweet Corn Chaat Business कसा सुरू करायचा ? संपूर्ण मार्गदर्शन 2025

पावसाळा आणि गरमा-गरम चविष्ट खाद्यपदार्थांची आठवण येणार नाही, अस होणारच नाही.पारंपरिक, भाजी वडापाव या पदार्थां सोबतच सध्या गरमागरम Sweet Corn Chaat हे सुद्धा लहान मुलांपासू ते वृद्ध लोकांच्या आवडीचे street food झाले आहे. चवदार,हेल्दी आणि झटपट तयार होणारे Sweet Corn सध्या लोकांना खूप आवडू लागले आहे. या blog post मध्ये Sweet Corn Chaat व्यवसाय कसा सुरु करायचा, किती गुंतवणूक करावी लागेल, कोणकोणते परवाने घेणे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे या Sweet Corn Chaat नफा किती मिळू शकतो या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. (Sweet Corn Chaat Business idea)

Sweet Corn Chaat Business : या पावसाळ्यात सुरु करा कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय

या पावसाळ्यात सुरू करा sweet corn chat व्यवसाय
sweet corn chat :  स्वीट कॉर्न चाट बिझनेस आयडिया

Sweet Corn Chaat म्हणजे काय?

Sweet Corn Chaat हा healthy chaat पैकी एक असून झटपट तयार होणार आहे. Sweet Corn Chaat हे उकडलेल्या मक्याच्या दाण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे Chaat मसाले, लिंबू ,चीज घालून तयार केले जाते. मसाला कॉर्न, स्पायसी कॉर्न,चीज कॉर्न,लेमन बटर कॉर्न अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये Sweet Corn Chaat, चाट कॉर्नरवर पहायला मिळतात.


Sweet Corn Chaat हा व्यवसायच का करावा?

  • हंगामी मागणी: Sweet Corn Chaat चा व्यवसाय तसा १२ हि महिने चालणार व्यवसाय आहे, पण पावसाळ्यात गरमागरम पदार्थांची मागणी जास्त वाढत असल्याने हा काळ Sweet Corn Chaat व्यवसायासाठो गोल्डन काळ आहे.
  • कमी गुंतवणूक: Sweet Corn Chaat हा कमीत-कमी गुंतवणुकीत म्हणजेच १० ते १५ हजार रुपयाचा गुंतवणुकीत सुरु करता येऊ शकतो. यासाठी कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही.
  • कमी जागेत सुरु होणार व्यवसाय: हा व्यवसाय अतिशय कमी जागेत सुरु होणार व्यवसाय आहे, अगदी टेबल काउंटर टाकून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

सुरु करण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची अंदाजे किंमत

साहित्य अंदाजे किंमत
गॅस स्टोव्ह किंवा इंडक्शन ₹1500 – ₹2500
मोठी कुकर / स्टील पातेली ₹800 – ₹1500
मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न) ₹100 – ₹150 / किलो
बटर, मसाले, चीज, लिंबू इत्यादी ₹1000 (सुरुवातीसाठी)
काऊंटर / स्टॉल / टेबल ₹2000 – ₹3000
डिस्पोजेबल कप व चमचे ₹500 – ₹1000

 

साहित्य खरेदी लिंक्स:

Pigeon Favourite 1800 W इंडक्शन कुकटॉप

Prestige Deluxe Plus Junior Handi

3‑पीस स्टेनलेस स्टील मिक्सिंग बॉउल्स

Kraft 50‑सेट डिस्पोजेबल कप्स


प्रत्यक्षात व्यवसाय सुरु करण्याची प्रोसेस:

1.वरती दिलेल्या खरेदी लिंक्स वरून किंवा स्थानिक बाजारपेठेतून साहित्य खरेदी करा.

2. सिझन असेल तर होलसेल मार्केटमधून किंवा ऑफ सिझन असेल तर फ्रोझन Sweet Corn चे दाणे कुकर मध्ये उकडून घ्या.

3.वेगवेगळे फ्लेवर्स तयार करण्यासाठी चिज, मसाला, बटर, लिंबू हे सर्व आधी प्रीपेर करून ठेवा.

4.कस्ट्मरच्या मागणीनुसार गरमागरम Sweet Corn छान डेकोरेट करून कस्टमरला द्या.

5.स्वच्छता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे स्वच्छतेला अधिक महत्व द्या, नियमित स्वच्छता ठेवा.

Sweet corn youtube recipes


हे नक्की वाच :

Business Idea : घरबसल्या काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंगचा व्यवसाय एक उत्तम पर्याय

Business Idea : श्रेडेड पेपर निर्मिती व्यवसाय व्यवसाय कसा सुरू करायचा?

अशाच बिझनेस आर्टिकल्ससाठी  व्हाट्सअप ग्रुप  जॉईन करा.

Join WhatsApp Group 

अंदाजे दर आणि नफा:

sweet Corn चा १ कप साधारण ३० ते ५० रुपयांना विकला जातो. अंदाजे १ किलो Sweet Corn मधून साधारण १० ते १२ कप तयार होतात.यावरून तुम्हाला साधारण दिवसाला ५०० ते १००० रुपयाचा नफा सहज मिळायला हवा.


Sweet Corn Chaat व्यवसायासाठी मार्केटिंग टिप्स:

  • तरुण वर्गात Sweet Corn जास्त लोकप्रिय आहे, त्यामुळे शाळा, कॉलेजांजवळ स्टॉल लावणे जास्त फायद्याचे ठरेल. ग्राहकांची संख्या झपझट्याने वाढेल.
  • sweet corn तयार करतानाचे व्हिडीओ आणि आकर्षक फोटो काढून Instagram, Facebook वर अपलोड करा सोबत वायरल हॅशटॅग वापरा:
    #SweetCornChaat, #LowInvestmentBusiness, #CornLovers, #StreetFoodMarathi याने ज्यास्त ग्राहक आकर्षित होतील.
  • व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप तयार करा नियमित ऑर पोस्ट करा.
  • फ्री सॅम्पल Buy 2 Get 1 Free,Refer & Get ₹10 Off आशा ऑफर ठेऊन नियमित ग्राहकांना आकर्षित करा.
  • Swiggy, Zomato वर व्यवसाय लिस्ट करून घरपोच सेवा उपलब्ध करून द्या.

कायदेशीर बाबी

फूड लायसन(FSSAI License):

Sweet Corn Chaat व्यवसाय खाद्यपदार्थाशी संबंधित असल्याने FSSAI (Food Safety and Standards Authority of India) परवाना घेणे आवश्यक आहे. सुरवातीला Basic FSSAI Registration करू शकता.

Udyam/MSME नोंदणी:

व्यवसाय अधिकृतरीत्या नोंदवण्यासाठी उद्योग आधार/Udyam Registration करून घ्या. याचा तुम्हाला कर्ज, सवलती, सरकारी योजना यांचा लाभ घेण्यासाठी फायदा होईल.

स्थानिक परवाने:

जर तुम्ही स्टॉल उभा करत असाल किंवा ठराविक ठिकाणी व्यवसाय करत असाल, तर स्थानिक नगरपालिका/ग्रामपंचायतीचा परवाना घेणे बन्धनकारक आहे.
त्या ठिकाणच्या नगरपरिषदेच्या कार्यालयातून माहिती मिळवा.


Sweet Corn Chaat
Sweet Corn Chaat

Sweet Corn Chaat हा व्यवसाय पावसाळ्यात सुरू करण्यासाठी उत्तम व्यवसाय आहे तसेच कमी खर्चाचा आणि नफा देणारा व्यवसाय आहे. फक्त थोडं प्रशिक्षण, चविष्ट तयारी आणि ग्राहकांची आवड ओळखली तर हा व्यवसाय तुम्हाला यशस्वी व्यावसाईक बनवेल.


या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती विविध ऑनलाइन व ऑफलाइन स्रोतांवर आधारित आहे आणि केवळ शैक्षणिक व मार्गदर्शनाच्या उद्देशाने दिली आहे.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधित कायदेशीर सल्लागार, स्थानिक प्रशासन किंवा अधिकृत संस्थांचा सल्ला घेणे.या माहितीचा उपयोग करून सुरू केलेल्या व्यवसायातून होणाऱ्या नफ्या-तोट्याची जबाबदारी ही वाचकाची स्वतःची असेल.

फक्त 10 ते 15 हजारात सुरू करा फायदेशीर Flash Stamp व्यवसाय – घरबसल्या कमाईची उत्तम संधी!

business idea 2025 : टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांसाठी करोडपती बनवणारी

Business Idea : फेकून दिलेल्या शहाळ्याच्या साली करून देतील दिवसाला रु. 20 ते 30 हजार कमाई

Make money from google news : गुगलवर काम करून रोज ₹2000-3000 कमवा

How to start online business 5 Steps Process : Online Business कसा सुरू करायचा ?

Leave a Comment